बाबो! मकरसंक्रांतीला मराठी अभिनेत्रीने काळ्या रंगाच्या साडीत केलं बोल्ड फोटोशूट, म्हणते- "मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:41 IST
1 / 9मकरसंक्रांतनिमित्त अनेक सेलिब्रिटींनी फोटोशूट केलं आहे. पण, एका मराठमोळ्या अभिनेत्रीने काळ्या रंगाच्या साडीत तिच्या हॉट अदा दाखवल्या आहेत. 2 / 9बॅकलेस अन् ट्युब ब्लाऊजमध्ये अभिनेत्रीने हे बोल्ड फोटोशूट केलं आहे. मकरसंक्रांतनिमित्त काळ्या साडीतील हे फोटो तिने शेअर केले आहेत. 3 / 9फोटोत दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉस मराठी फेम रुचिरा जाधव आहे. 4 / 9रुचिराने हे फोटो शेअर करत चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 5 / 9'तिळगुळ घ्या..खरं बोला..गोड मला फार आवडत नाही', असं कॅप्शन तिने दिलं आहे. 6 / 9समुद्रकिनारी रुचिराने हे फोटोशूट केलं आहे. रुचिराच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 7 / 9रुचिराने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत माया ही भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली.8 / 9रुचिरा 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात बॉयफ्रेंडबरोबर सहभागी झाली होती. त्यामुळे ती चर्चेतही आली होती.9 / 9'ठरलं तर मग' या मालिकेतही ती झळकली होती. तर 'बाबू' या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसली होती.