शिबानीला अंकितावर आरोप करणं पडलं महागात, टीव्हीवरील कलाकारांनी सुनावले तिला खडे बोल By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 4:11 PM1 / 10सुशांत सिंह राजपूत केसप्रकरणी अभिनेत्री शिबानी दांडेकरला अंकिला लोखंडेवर प्रसिद्धीचा आरोप करणं महागात पडलंय. शिबानीने स्पष्टपणे आरोप केला होता की, अंकिता लोखंडे २ सेकंदाच्या फेमसाठी हे सगळं करत आहे आणि त्यासाठीच ती रिया चक्रवर्तीला टार्गेट करत आहे. अशात आता टीव्हीवरील अनेक सेलिब्रिटींनी अंकिताची बाजू घेत शिबानीला खडे बोल सुनावले आहेत.2 / 10अंकिताला सपोर्ट करण्यासाठी अभिनेत्री हिना खान, काम्या पंजाबी, देवोलीना भट्टाचार्याजी, विकास गुप्ता, रश्मी देसाईसारखे सेलिब्रिटी समोर आले आहेत. 3 / 10हिना खान ने लिहिले की, 'एक व्यक्ती जिने आपल्या मेहनतीच्या जोरावर टीव्ही आणि सिनेमात आपलं स्थान मिळवलं. एक मुलगी जिने शून्यातून उभं राहत टीव्ही स्टार बनल आणि सिनेमात आपली वेगळी ओळख निर्माण केली. अर्थातच तिला २ सेकंदाच्या फेमची गरज नाही. तुझ्या ध्येर्यासाठी आणि प्रवासासाठी खूप प्रेम अंकिता. सर्व गोष्टींमध्ये सन्मान समान असला पाहिजे'.4 / 10या मुद्द्यावरून अभिनेत्री काम्या पंजाबीने लिहिले की, '२ सेकंदाचं फेम? खरंच? तेही त्या व्यक्तीच्या मृत्यूतून जो अंकितासाठी तिचं पूर्ण विश्व होता? केवळ वाईट व्यक्तीच असा विचार करू शकतो. अंकिता जे लोक तुला ओळखता, त्यांना तुझं सत्य चांगल्याप्रकारे माहीत आहे'.5 / 10देवोलीना भट्टाचार्यजीने अंकिताबाबत आपली बाजू मांडत लिहिले की, 'ती कुणीही असो, पण मला इतकं माहीत आहे की, ती अंकिताला टार्गेट करून २ सेकंदाचं फेम मिळवत आहे. हे तर फारच झालं. कुठून येतात हे लोक आणि कोणत्या जगात जगतात. तुला आणखी जास्त शक्ती मिळो अंकिता'.6 / 10रश्मी देसाईने तिच्या लांबलचक पोस्टमध्ये लिहिले की, 'अंकिता लोखंडे तू एक मोठी स्टार आङे आणि लोकांनी तुझ्या प्रत्येक रूपाला पसंत केलंय. आणि तुला त्या लोकांना काहीच सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही ज्यांना तुझं काहीच महत्व नाही. आय लव यू. लोकांचा मेंदू फार संकुचित झालाय. मला तुझं दु:खं माहीत आहे आणि मी त्याचा सन्मान करते. पण कोणतीही माहिती असल्याशिवाय कुणाला ब्लेम करणे योग्य नाही. तो तेव्हा स्टार नव्हता. जेव्हा अंकिता त्याच्यासोबत होती. त्यामुळे प्लीज त्यांच्या रिलेशनशिपवर कमेंट करू नका. त्यानंतर त्याने कुणावर प्रेम केलं यापेक्षा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की, एक शानदार व्यक्ती आपल्याला सोडून गेलाय'.7 / 10करणवीर बोहराने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली की, 'अंकिता, मी तुला फार पूर्वीपासून ओळखतो. तेव्हापासून जेव्हा तू आणि सुशांत सोबत होते. मी पाहिलंय की, तुझ्या मनात सुशांतसाठी किती प्रेम आणि किती जबाबदारी होती. अशात दुसऱ्याने कुणी त्यावर कमेंट करणे दु:खद आहे'.8 / 10अंकिताने मेसेजेमध्ये लिहिले होते की, 'मला पुन्हा पुन्हा मीडिया विचारते की, काय वाटतं हा मर्डर आहे की सुसाइड? त्यामुळे मी हे स्पष्ट करण्यासाठी सांगते की, मी कधीच म्हणाले नाही की, हा मर्डर आहे किंवा यासाठी एखादी विशेष व्यक्ती जबाबदार आहे. मी नेहमीच माझा दिवंगत मित्र सुशांत सिंह राजपूतच्या न्यायाची मागणी केली आहे. मी त्याच्या परिवारासोबत उभी आहे. आणि तपास यंत्रणेसमोर सत्य आलं पाहिजे'.9 / 10अंकिताने पुढे लिहिले की, 'डिअर हेटर्स, चला मान्य करू की, तुम्हाला तुमच्या मित्राबाबत सगळं काही नक्कीच माहीत असेल की, त्याच्या जीवनात आणि रिलेशनशिपमध्ये काय सुरू आहे. हे बघून चांगलं वाटलं की, अखेर तुम्ही झोपेतून उठलात. पण कदाचित तुम्ही आधी शुद्धीवर आले असता तर आपल्या मित्राला ड्रग्स न घेण्याचा सल्ला दिला असता. त्याना सुशांतच्या मेंटल हेल्थबाबत माहीत होतं कारण त्यांनी पब्लिकली सांगितलं होतं की, तो डिप्रेशनमध्ये होता'.10 / 10अंकिताने प्रश्न विचारलाय की, 'काय तिने एका डिप्रेस्ड व्यक्तीला ड्रग्स सेवन करण्याची परवानगी द्यावी? त्याने त्याची मदत कशी होईल? त्याची कंडीशन त्या लेव्हलपर्यंत पोहोचली होती, ज्याने एक व्यक्ती सुशांतसारखा होईल. ती त्यावेळी सुशांतच्या सर्वात जवळ होती. एकीकडे ती सांगते की ती सुशांतच्या भल्यासाठी सर्व डॉक्टरांसोबत को-ऑर्डिनेट करत होती. दुसरीकडे ती सुशांतसाठी ड्रग्सचं को-ऑर्डिनेट करत होती'. आणखी वाचा Subscribe to Notifications