कोकण, समुद्रकिनारा अन् सात फेरे! मराठी अभिनेत्याने दणक्यात उडवला लग्नाचा बार, पाहा लग्नाचा अल्बम By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 12:33 PM1 / 11सिनेविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 2 / 11मराठी अभिनेता अभिषेक गावकरही लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अभिषेकने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसह लग्नगाठ बांधली आहे.3 / 11कोकणात समुद्रकिनारी अभिषेकने सोनालीसोबत सात फेरे घेतले. त्यांच्या लग्नाचा अल्बम समोर आला आहे. 4 / 11पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. आयुष्यातील या खास क्षणासाठी अभिषेक आणि सोनालीने पारंपरिक पेहराव केला होता. 5 / 11सोनालीने पिवळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. तर अभिषेकने धोतर घातलं होतं. 6 / 11अभिषेक आणि सोनालीच्या लग्नातील काही खास क्षण कॅमेऱ्यात टिपले गेले आहेत. 7 / 11काही महिन्यांपूर्वीच त्यांनी साखरपुडा केला होता. आता ते लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. 8 / 11अभिषेकने 'रात्रीस खेळ चाले', 'सुख म्हणजे नक्की काय असतं,' 'माझी माणसं', 'हंडरेड डेज' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 9 / 11सारं काही तिच्यासाठी मालिकेत त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. 10 / 11तर सोनाली एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. ती इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असते. 11 / 11तिचे ३ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तिचे अनेक रील व्हिडिओही व्हायरल होत असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications