कुशल बद्रिकेच्या पत्नीचे बोल्ड फोटो व्हायरल; सुनयनाचा लूक पाहून चाहते थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 11:54 AM1 / 10'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके.2 / 10उत्तम अभिनयकौशल्य आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधण्याचं कौशल्य यांच्या जोरावर कुशलने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं.3 / 10कुशल कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे तो त्याच्या वैयक्तिक जीवनातील काही गोष्टी सुद्धा चाहत्यांसोबत शेअर करतो.4 / 10कुशल बऱ्याचदा त्याच्या पत्नीविषयी म्हणजेच सुनयनाविषयी पोस्ट शेअर करत असतो. त्याच्या या प्रत्येक पोस्टमधून त्याचं पत्नीवरचं प्रेम दिसून येतं.5 / 10अलिकडेच सुनयनाने सोशल मीडियावर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. यात ती कमालीची सुंदर आणि बोल्ड दिसून येत आहे.6 / 10सुनयनाने कॅलिफॉर्निया येथे खास फोटोशूट केलं असून यात तिचा बोल्ड अॅटिट्यूड दिसून येत आहे.7 / 10सुनयनाचे हे फोटो पाहून नेटकरी सध्या त्यावर कमेंटचा पाऊस पाडत आहेत.8 / 10सुनयना सुद्धा कुशलप्रमाणेच कलाविश्वाशी निगडीत आहे. ती एक कथ्थक नृत्यांगना आहे.9 / 10सुनयना हिने कथ्थकचं पदवीधर शिक्षण घेतलं आहे. कथ्थकमध्ये विशारद आणि अलंकार अशी पदवी तिनं संपादन केली आहे.10 / 10सुनयना स्कूल ऑफ कथ्थक अशी नृत्यसंस्था देखील चालवते. आणखी वाचा Subscribe to Notifications