५२ वर्षाच्या 'या' मराठी अभिनेत्रीचे 'योगा' करतानाचे फोटो पाहून व्हाल थक्क ! फिटनेसबाबतीत सर्वांना टाकलं मागे By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 9:35 AM1 / 9‘या सुखांनो या’ मालिकेतील हळवी भूमिका असो आणि आता ‘लेक माझी लाडकी’ मालिकेतील निगेटिव्ह भूमिका ऐश्वर्या नारकर यांनी कायम आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. म्हणूनच गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांना चाहत्यांचे प्रेम मिळत आले आहे.2 / 9नाटक, मालिका आणि चित्रपटातून भेटणारी ही गोड चेहऱ्याची आणि सुंदर हास्याची अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर यांनी पाहिले जाते.वयाच्या ५२ व्या वर्षीही तरुणींनाही लाजवेल असे त्यांचे मनमोहक रुप आहे. त्यांच्याकडे बघून अनेकांना वयाचा अंदाजही येणार नाही.3 / 9ऐश्वर्या फिटनेस बाबतीत खूप जागरुक असतात. नुकतेच त्यांनी शेअर केलेले योगाचे फोटो पाहून त्यांच्या फिटनेसचा अंदाज येईल. त्यांचे फोटो पाहून तरुणीही लाजतील इतक्या त्या सुंदर दिसतात. ५२ व्या वर्षीही तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.4 / 9ऐश्वर्याच्या या फोटोंवर मराठी कलाकारांनीही कमेंट्स केल्या आहेत. कलाकारही त्यांचा फिटनेस पाहून भारावून जात आहेत. ऋतुजा बागवे, आश्विनी कासकर, आशुतोष गोखले, रुपल आनंद यांनी ऐश्वर्या यांचे कौतुक केले आहे. 5 / 9पारंपारिक लुक असो किंवा वेस्टर्न लुक ऐश्वर्या तेवढ्याच आत्मविश्वासाने ते कॅरी करतात. त्यांच्या अदांनी त्या अनेकांना जणू भुरळच घालतात.6 / 9ऐश्वर्या नारकर सध्या त्या सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेत सासूची भूमिका साकारत आहेत.यामध्ये त्यांनी निगेटिव्ह भूमिकाही तेवढीच उत्तमरित्या निभावली आहे.7 / 9ऐश्वर्या नारकर सध्या त्या सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेत सासूची भूमिका साकारत आहेत.यामध्ये त्यांनी निगेटिव्ह भूमिकाही तेवढीच उत्तमरित्या निभावली आहे.8 / 9५२ व्या वर्षीही त्यांचा हा अंदाज पाहून अनेक महिलांसाठी त्या खरं आदर्शच ठरत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील हसूही तितकंच गोड आहे.9 / 9ऐश्वर्या नारकर अनेकदा पती अविनाश नारकर व मुलगा अमेय नारकर यांच्यासोबत रील्स सुद्धा शेअर करत असतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर १ लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications