अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेचा यंदाचा 'दिवाळी पाडवा' खूपच खास, हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 16:09 IST
1 / 7अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल. २०२३ मध्ये नोव्हेंबर महिन्यात या दोघांनी लग्न केलं2 / 7प्रसाद जवादेने दिवाळीमध्ये आईसोबत खास फोटो काढले. प्रसादचं त्याच्या आईसोबत खास नातं बघायला मिळतं3 / 7अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी दिवाळीनिमित्त एकमेकांना मॅचिंग कपडे परिधान केले होते. 4 / 7अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे या दोघांनी फुलबाजी हातात घेऊन खास फोटो काढले. दोघांच्या फोटोंची चांगलीच चर्चा आहे5 / 7अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा यंदाचा दिवाळी पाडवा खास आहे. कारण नुकत्याच झालेल्या झी गौरव पुरस्कार सोहळ्यात प्रसादला सर्वोत्कृष्ट नायक म्हणून पुरस्कार मिळाला6 / 7अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी गेल्या वर्षभरात आपापल्या कलाकृतींमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. प्रसाद सध्या 'पारु' मालिकेत तर अमृता 'नियम व अटी लागू' नाटकात अभिनय करतेय.7 / 7अमृताने सुद्धा प्रसादची आई अर्थात सासूबाईंसोबत खास फोटो काढले. प्रसाद-अमृताच्या या दिवाळी विशेष फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे