Amruta Khanvilkar: फॅशन अन् सौंदर्याची बातच न्यारी, अमू दिसतेय जणू गुलाबी परी! By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 5:33 PM1 / 7अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये काम करून तिने अभिनयाची छाप पाडली. 2 / 7सध्या अमृता 'ड्रामा ज्युनियर्स' या झी मराठीवरील रिएलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. या शोसाठी अमृताने खास लूक केला होता. 3 / 7गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंट स्कर्ट आणि टॉपमध्ये अमृताने फोटोशूट केलं आहे. केसांचा बन बांधून तिने ग्लॅमरस लूक केला आहे. 4 / 7फोटोसोठी अमृताने खास पोझही दिल्या आहेत. या फोटोंमध्ये अमृता जणू एखाद्या परीसारखीच भासत आहे. 5 / 7अमृताचे हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. 6 / 7अमृताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 7 / 7अभिनेत्रीबरोबरच अमृता एक उत्तम नृत्यांगणादेखील आहे. 'वाजले की बारा' या लावणीमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. 'चंद्रमुखी' सिनेमातून तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications