'जरा प्राजक्ता माळीकडे बघ'; वजन कमी केल्यामुळे भाग्यश्री लिमये ट्रोल By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 3:44 PM1 / 11मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री लिमये. 2 / 11घाडगे अँड सून या मालिकेतून भाग्यश्रीने कलाविश्वात पदार्पण केलं आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली.3 / 11उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी भाग्यश्री सध्या तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.4 / 11अलिकडेच भाग्यश्रीने एक फोटोशूट केलं. यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.5 / 11भाग्यश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खिडकीत बसली असून तिने फोटोसाठी काही पोझ दिल्या आहेत.6 / 11भाग्यश्रीचे हे फोटो पाहून अनेकांनी तिच्या कमी वजनामुळे तिला ट्रोल केलं आहे.7 / 11या फोटोमध्ये भाग्यश्री खूप बारीक दिसत असल्यामुळे अनेकांनी तिला वजन वाढवायचा सल्ला दिला आहे.8 / 11'अगं भाग्यश्री भरपूर जेवत जा गं. सोलापूरच्या मुली एवढ्या अशक्त नसतात. जरा प्राजक्ता माळीकडे बघ', असं एका नेटकऱ्यानी म्हटलं आहे.9 / 11'आतमध्ये जा नाही तर वारा आला तर पडशील', असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.10 / 11दरम्यान, भाग्यश्रीच्या या फोटोवर अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. तर काही जणांनी तिचं कौतुकही केलं आहे.11 / 11भाग्यश्रीने शेअर केलेला छानसा फोटो आणखी वाचा Subscribe to Notifications