Join us  

राणीच्या बागेत भाग्यश्री लिमयेचा एक उनाड दिवस, अभिनेत्रीने केली मजा-मस्ती करत केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 3:37 PM

1 / 7
भाग्यश्री लिमये ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. भाग्यश्रीने अलीकडेच हिंदी वेबसीरिज आणि सिनेमांमध्येही तिची ओळख निर्माण केलीय
2 / 7
भाग्यश्री लिमयेने वेळात वेळ काढून मुंबईतील भायखळ्याच्या राणीच्या बागेला भेट देऊन तिथे मजा-मस्ती केलेली दिसली
3 / 7
भाग्यश्री लिमयेने तिथे बंद काचेआड असलेल्या वाघासोबत फोटो काढले. हे फोटो इंटरनेटवर सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत
4 / 7
काहीच महिन्यांपूर्वी राणीच्या बागेचं नूतनीकरण करण्यात आलं. त्यानंतर भाग्यश्रीने या ठिकाणी खास भेट देऊन एक दिवस मजेत घालवला
5 / 7
भाग्यश्री लिमये अलीकडेच आपल्याला हिंदीत गाजलेल्या मुंज्या सिनेमात बघायला मिळाली. मुंज्यामध्ये भाग्यश्रीने साकारलेल्या भूमिकेचं कौतुकही झालं
6 / 7
भाग्यश्री लिमयेची भाडीपासोबत असलेली कांदेपोहे ही खास सीरिज चर्चेत आहे
7 / 7
भाग्यश्री लिमयेने घाडगे अँड सून मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. आज भाग्यश्री आघाडीची अभिनेत्री आहे
टॅग्स :मराठीराणी बगीचाबॉलिवूड