Join us

'तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला!' संगीत सोहळ्यात कौमुदी वलोकरचा होणाऱ्या नवऱ्यासोबत डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 10:14 IST

1 / 7
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अर्थात कौमुदी वलोकरची लगीनघाई सुरु आहे. कालच कौमुदीचा संगीत सोहळा पार पडला
2 / 7
या संगीत सोहळ्यात कौमुदीचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. सर्वांनी खास डान्स करत कौमुदी आणि तिचा होणारा नवरा आकाशला शुभेच्छा दिल्या
3 / 7
या संगीत सोहळ्यासाठी कौमुदीने खास ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस परिधान करुन कौमुदीने फोटोशूट केलं
4 / 7
तुझ्या पिरतीचा हा विंचू मला चावला, कुडी घुमा देखो देखो ना अशा मराठी-हिंदी गाण्यांवर कौमुदी थिरकताना दिसली
5 / 7
कौमुदी - आकाशच्या या डान्स परफॉर्मन्सला त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी चांगलीच दाद दिलेली दिसली. दोघांनी या संगीत सोहळ्यासाठी किती मेहनत केली हे यातून दिसून येतं
6 / 7
कौमुदी वलोकर येत्या काहीच दिवसांमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. कौमुदीच्या लग्नाची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे
7 / 7
कौमुदी आणि तिचा होणारा पती आकाश चौकसे यांनी संगीत सोहळ्यात रोमँटिक फोटोशूट केलेलं दिसलं.
टॅग्स :आई कुठे काय करते मालिकालग्न