मुंबई किंवा पुण्याची नाहीये अरुंधती; उत्तर महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी गेलंय मधुराणीचं बालपण By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 3:58 PM1 / 8मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर. आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून मधुराणीने तुफान लोकप्रियता मिळवली आहे.2 / 8आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचा पाहायला मिळतो.3 / 8अरुंधती उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक कवयित्रीदेखील आहे.4 / 8मराठीतली गुणी अभिनेत्री म्हणून मधुराणीकडे पाहिलं जातं. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.5 / 8सध्या मधुराणी पुण्यात राहत असून ती मालिकेच्या शुटिंगसाठी वरचेवर मुंबई-पुणे प्रवास करत असते.6 / 8अनेकांना असं वाटतं की मधुराणी पुण्याची आहे. परंतु, मधुराणी मूळची पुण्याची नसून तिचं बालपण उत्तर महाराष्ट्रात गेलं आहे.7 / 8मधुराणी मूळची भुसावळची आहे. इथेच तिची जडणघडण झाली.8 / 8बराच काळ भुसावळमध्ये घालवल्यानंतर ती पुण्यात स्थायिक झाली. आणखी वाचा Subscribe to Notifications