Join us  

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मनमोहक अदा, साडीतील फोटोशूटने वेधलं लक्ष; ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 1:47 PM

1 / 7
सध्या टेलिव्हिजनवरील मराठी मालिकांमध्ये अनेक नव्या अभिनेत्रींनी पदार्पण केलं आहे. पदार्पणातच या अभिनेत्री लक्ष वेधून आहेत. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर त्या ठसा उमटवत आहेत.
2 / 7
अशीच एक लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar). जिला सध्या सगळे रमा याच नावाने ओळखतात. शिवानी 'स्टार प्रवाह' वरील 'मुरांबा' मालिकेतून लोकप्रिय झाली.
3 / 7
शिवानी आणि शशांक केतकरची जोडी चांगलीच गाजत आहे. दोघांची मालिकेतली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. त्यातच शिवानीच्या निरागस अभिनयामुळे तिचं कौतुक होत आहे.
4 / 7
शिवानी दिसायला अगदीच सालस, सुंदर आहे. तिने नुकतेच साडीत सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. जांभळा स्लीव्हलेस ब्लाऊज आणि पिस्ता कलरची साडी यात तिचं सौंदर्य खुललं आहे.
5 / 7
साडीचा पदर उडवत तिने छान पोजही दिल्या आहेत. कानात घातलेले झुमके सौंदर्य वाढवत आहेत. तसंच तिची किलर स्माईल चाहत्यांना प्रेमात पाडणारी आहे. 'शायद फसाना, जो दास्ताँ बन जाए' असं कॅप्शन तिने दिलं आहे.
6 / 7
शिवानीच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. 'किती गोड आहे यार तू','अतिसुंदर','नखरेल शिवानी' अशा कमेंट्स आल्या आहेत.
7 / 7
शिवानी मूळची कराडची आहे. अभिनयाचं स्वप्न बघत ती मुंबईत आली. 'मुरांबा' ही तिची पहिलीच मालिका आहे. तिच्या पहिल्याच कामाचं प्रेक्षकांकडून भरभरुन कौतुक होत आहे.
टॅग्स :मराठी अभिनेतासोशल मीडियाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार