Join us  

प्रियदर्शिनी इंदलकरच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, शॉर्ट वनपीसमध्ये दिसतेय खूपच क्यूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 1:00 PM

1 / 8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालते.
2 / 8
'फुलराणी' बनून मोठ्या पडद्यावर आलेली प्रियदर्शिनी मल्टिटॅलेंटेड आहे. कॉमेडी असो किंवा गंभीर कोणत्याही भूमिकेत ती एकदम उठून दिसते.
3 / 8
प्रियदर्शिनीचे सोशल मीडियावर बरेच चाहते आहेत. तिच्या फोटोशूटने ती कायम चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. नुकतंच काळ्या वनपीसमध्ये तिने पोस्ट केलेले फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
4 / 8
हातात फुलांचा गुच्छ, काळेभोर डोळे, बन करुन बांधलेले कुरळे केस, अशा लूकमध्ये तिचा हा फोटो खूपच सुंदर दिसतोय. याच तिची तीक्ष्ण नजर काळजाला भिडणारी आहे.
5 / 8
या क्यूट लूकमध्ये प्रियदर्शिनीने मस्त पोज दिल्या आहेत. निसर्गरम्य वातावरणात प्रियदर्शिनीने हे फोटोशूट केलं आहे.
6 / 8
प्रियदर्शिनीने परिधान केलेल्या या काळ्या वनपीसला पारंपरिक टच आहे. ड्रेसच्या मागच्या बाजूला महिलेच्या चित्राची डिझाईन आहे. तिचा हा हटके ड्रेस तरुणींच्या पसंतीस पडला आहे.
7 / 8
'जेव्हा खास दिवशी भारतीय महिलेला काहीतरी बोल्ड परिधान करायचं असतं. काहीतरी ग्लॅमरस. काहीतरी क्लासी पण सेक्सी. काहीतरी भारतीय. ' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
8 / 8
प्रियदर्शिनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून तर प्रेक्षकांना हसवतच आहे. शिवाय तिने २ मराठी सिनेमांमध्ये मुख्य भूमिकाही साकारली आहे. मल्टिटॅलेंटेड प्रियदर्शिनीचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे.
टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीमहाराष्ट्राची हास्य जत्रासोशल मीडियाव्हायरल फोटोज्