PHOTOS : मी खरंच खूप भाग्यवान आहे..., शर्मिष्ठा राऊतची नवऱ्यासाठी लयभारी पोस्ट By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 6:08 PM1 / 9‘बिग बॉस मराठी’मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत सध्या सेलिब्रेशन मूडमध्ये आहे. होय, सेलिब्रेशन कसलं तर नवऱ्याच्या वाढदिवसाचं. आज तिच्या लाडक्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. 2 / 9 होय, शर्मिष्ठाचा पती तेजस देसाईच्या वाढदिवसाचं गोव्यात जंगी सेलिब्रेशन झालं आणि या सेलिब्रेशनचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.3 / 9 जगातल्या सगळ्यात भारी नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखा खरं प्रेम करणारा नवरा मिळाला. तूला जे हवय ते सगळं मिळो....,असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. 4 / 9 मी स्वत:ची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रचंड मेहनत करणाऱ्या मुलासोबत लग्न केलंय आणि त्याचा मला अभिमान वाटतो, अशा शब्दात भावना व्यक्त करत शर्मिष्ठाने तेजसला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 5 / 9 काही दिवसांपूर्वीच शर्मिष्ठाने तेजसला वाढदिवसाचं गिफ्ट दिलं होतं. तिने त्याला नवी कोरी अलिशान कार भेट दिली होती.6 / 9 शर्मिष्ठाने 11 ऑक्टोबर 2020 रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तेजस देसाईसोबत लग्न केलं होतं. शर्मिष्ठाचं हे दुसरं लग्न आहे.7 / 9यापूर्वी तिने अमेय निपाणकरसोबत लग्न केलं होतं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. पण तेजससोबत शर्मिष्ठा प्रचंड आनंदी आहे.8 / 9शर्मिष्ठा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मन उधाण वाऱ्याचे, जुळून येती रेशीम गाठी, कुंपण,सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, एक झुंज वादळाशी या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 9 / 9शर्मिष्ठा सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती तिच्या फोटोंसोबतच आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. आणखी वाचा Subscribe to Notifications