Join us

साध्या ड्रेसमध्येही सुंदर दिसते 'लागीरं झालं जी'ची शितली; सिंपल लूकमध्ये जिंकली नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 6:12 PM

1 / 7
'लागीरं झालं जी' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर.
2 / 7
या मालिकेत शितल पवार अर्थात शितली ही भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांचं अफाट प्रेम मिळवलं.
3 / 7
या मालिकेनंतर शिवानीने कुसूम या मालिकेतही काम केलं. त्यामुळे सोशल मीडियावर तिची वरचेवर चर्चा रंगत असते.
4 / 7
शिवानी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून वरचेवर ती चाहत्यांच्या भेटीला येत असते.
5 / 7
अलिकडेच शिवानीने छानसं फोटोशूट केलं आहे. यातील काही निवड फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले.
6 / 7
या फोटोमध्ये शिवानी अत्यंत साध्या लूकमध्ये दिसत आहे. मात्र, या लूकमध्येही ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
7 / 7
शिवानीच्या या फोटोला विशेष पसंती मिळत आहे.
टॅग्स :शिवानी बावकरसेलिब्रिटीटेलिव्हिजन