Join us  

'बहुत सरस लागे छे!' श्रेया बुगडेच्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स, नवरात्री लूकची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 11:29 AM

1 / 7
अभिनेत्री श्रेया बुगडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. श्रेयाला आपण 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून अभिनय करताना पाहिलंय
2 / 7
श्रेया बुगडेने स्पेशल नवरात्री लूक कॅरी केलाय. या लूकमध्ये श्रेया बुगडेने खास दागिने परिधान केले आहेत
3 / 7
नवरात्री स्पेशल चनिया चोली श्रेया बुगडेने परिधान केली आहे. श्रेया बुगडे या लूकमध्ये खूप सुंदर दिसतेय
4 / 7
श्रेया बुगडे सध्या ड्रामा ज्युनियर या शोचं सूत्रसंचालन करतेय. श्रेया बुगडेच्या अँकरींगला प्रेक्षकांकडूनही चांगली दाद मिळतेय
5 / 7
श्रेया बुगडेने चला हवा येऊ द्या शोमध्ये विविध कॅरेक्टर करुन प्रेक्षकांना खळखळून हसवलं. श्रेयाला मराठीतली कॉमेडी क्वीन म्हणून ओळखलं जातं
6 / 7
श्रेया बुगडेच्या या खास नवरात्री लूकला 'बहुत सरस लागे छे', 'सरस लागे' अशा खास गुजराती कमेंट करुन लोकांनी तिच्या लूकला पसंती दिलीय
7 / 7
श्रेया बुगडे विविध पोस्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. कधी पारंपरिक तर कधी ग्लॅमरस लूक परिधान करुन श्रेयाच्या फोटोंची सर्वांना भुरळ पडते.
टॅग्स :श्रेया बुगडेटेलिव्हिजनचला हवा येऊ द्या