मायेचा पदर! पूजाच्या लग्नासाठी सुखदाने नेसली खास आईच्या ठेवणीतली साडी By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 4:09 PM1 / 7मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुखदा खांडकेकर. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर सुखदा आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.2 / 7मराठी कलाविश्वासह सुखदा हिंदी मालिकाविश्वातही चांगलीच सक्रीय आहे. तिने आजवर अनेक गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.3 / 7सुखदाने बाजीराव मस्तानी, उमराव, गुरुकूल यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे.4 / 7सुखदा सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. अलिकडेच तिने अभिनेत्री पूजा सावंत हिच्या लग्नाला हजेरी लावली होती.5 / 7पूजाच्या लग्नात सुखदाने तिचं खास फोटोशूट केलं आहे. यातील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले.6 / 7सुखदाने खास तिच्या आईची ठेवणीतली साडी पूजाच्या लग्नात नेसली होती. या साडीतील फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये आईची साडी असल्याचं सांगितलं आहे.7 / 7सुखदा लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकर याची पत्नी आहे. अभिजीत आणि तिने १ फेब्रुवारी २०१३ मध्ये लग्नगाठ बांधली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications