PHOTOS : मराठमोळी अभिनेत्री सुलेखा तळवलकर हिची लेक तिच्याइतकीच आहे सुंदर, पाहा तिचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 8:00 AM1 / 10एकाहून एक धमाकेदार भूमिकेतून मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री सुलेखा तळवळकर हिला कोण ओळखत नाही. कधी आई, कधी सासूच्या भूमिकेत सुलेखा तळवलकर घराघरात पोहोचली आहे. पण आज आम्ही सुलेखाबद्दल नाही तर तिच्या लेकीबद्दल सांगणार आहोत.2 / 10होय, सुलेखा किती सुंदर आहे, हे वेगळी सांगायची गरज नाही. तिची लेकही तिच्याइतकीच सुंदर आहे. तिचे फोटो पाहाल तर पाहातच राहाल.3 / 10 सोशल मीडियावर सुलेखा प्रचंड सक्रीय असते. मालिका आणि विविध प्रोजेक्टस, खासगी आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसह शेअर करत असते. सुलेखाने मुलीसोबतही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.4 / 10सुलेखाची मुलगीही तिच्यासारखीच सुंदर दिसते. सध्या सोशल मीडियावर माय लेकींचे फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स मिळताना पाहायला मिळते.5 / 10सुलेखाच्या लेकीचं नाव टिया आहे. आई इतकीच सुंदर दिसणाऱ्या टियाच्या फोटोंवर चाहते फिदा आहेत. तिचे फोटो पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल.6 / 10 सुलेखा यांची वेगळी ओळख करुन द्यायला नको.सुलेखा यांनी अंबर तळवलकरसह लग्न केले आहे.अंबर तळवलकर हा स्मिता तळवलकर यांच्या मुलगा आहे. सुलेखा दिवंगत स्मिता तळवलकर यांच्या सून आहेत. 7 / 10अंबर आणि सुलेखा यांना दोन मुलं आहेत. आर्य आणि टिया अशी मुलांची नावं आहेत. प्रत्यक्ष जीवनात टिया कशी आहे हे तुम्हालाही जाणून घ्यायची इच्छा असेल.8 / 10 2021 मध्ये टियाने सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता. तिला ‘मिस दादर 2021’ या सौंदर्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालं होतं.9 / 10 टियाला ज्वेलरी डिझाईनिंगमध्ये करण्याची आवड असून वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवायला तिला आवडतात.आईसोबत टिया वेगवेगळ्या रेसिपी युट्युब चॅनलवर शेअर करताना दिसून येते.10 / 10 तळवलकर ग्रुप्सचे विविध ठिकाणी फिटनेस सेंटर आहेत. याचेही कामकाज ती सांभाळते. टियाने आई आणि आजीप्रमाणे अभियक्षेत्रात एंट्री केली नसली तरी तिची आवड जपत हटके काम करत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications