'त्याने माझा विश्वासघात केला...' 36 वर्षीय मराठी अभिनेत्रीचा झाला प्रेमभंग, व्यक्त केल्या भावना By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 5:04 PM1 / 10मनोरंजनविश्वात कधी कोणाचं सूत जुळेल आणि कधी कोणाचं ब्रेकअप होईल सांगता येत नाही. प्रत्येकजम कधी ना कधी ब्रेकअपच्या दु:खातून गेला आहे. नुकतंच एका मराठी अभिनेत्रीने तिला प्रेमात मिळालेल्या विश्वासघातावर भावना व्यक्त केल्या आहेत.2 / 10ती अभिनेत्री म्हणजे यशश्री मसुरकर (Yashashree Masurkar). यशश्री 'टुकटुक राणी' म्हणून ओळखली जाते. तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे तर नुकतीच ती मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती.याशिवाय ती व्हॉईस आर्टिस्टही आहे.3 / 10यशश्रीला खरी लोकप्रियता मिळाली ती 'रंग बदलती ओढणी' या हिंदी मालिकेतून. यातील तिने साकारलेली खनक ही भूमिका खूप गाजली. आजही लोक तिला खनक या नावानेच जास्त ओळखतात. 4 / 10यशश्रीने नुकतंच तिच्या लव्हलाईफवर भाष्य केलं. ईटाईम्सच्या वृत्तानुसार ती म्हणाली, 'मी एकाच्या प्रेमात अक्षरश: वेडी होते. तो या इंडस्ट्रीतलाच होता पण अभिनेता नव्हता. आमचं नातं खूप घट्ट आहे असंच मला वाटत होतं. आणि प्रत्येक मुलीप्रमाणे मी सुद्धा लग्नाची स्वप्न बघितली.'5 / 10ती पुढे म्हणाली,'पण मी चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं. त्याने माझा विश्वासघात केला आणि माझं हृदय तुटलं. मला लग्नच करायचं नाही तुझ्याशी काय कोणाशीच नाही असं म्हणत त्याने आमचं नातं तोडलं.'6 / 10यशश्री म्हणाली,'मला सर्वात जास्त लागलेली गोष्ट म्हणजे त्याने हे मला तेव्हा सांगितलं जेव्हा मी अगदी मनाने त्याची झाले होते. मी त्याच्या संघर्षाच्या काळात त्याला मदत केली. त्याने मला सोडल्यानंतर मी कोसळले होते पण याच परिस्थितीने मला आणखी मजबूत बनवलं.'7 / 10मी स्वत:लाच प्रश्न विचारला की मी दुसऱ्या कोणाला मला अशाप्रकारे वागवण्याचा हक्क दिलाच कसा? आता मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण माझा अजूनही प्रेमावर विश्वास आहे. मला कोणतंही बंधन नकोय. आता मी फ्री स्पिरीट आहे.'8 / 10लग्नाबाबत यशश्रीला वाटतं की तुम्ही जर खरंच मनापासून कोणावर प्रेम करत असाल तर त्याला लग्न हा टॅग लावण्याची गरज काय? कोणत्याही कायदेशीर ड्रामा शिवाय वेगळे होऊ शकत असाल आणि तरी तो तुम्हाला सोडत नसेल तर ते खरं प्रेम.9 / 10सध्या यशश्री कोणाला डेट करत आहे का? यावर ती म्हणाली,'सध्या मी एकाशी बोलत आहे पण अजून पक्कं नाही. एकमेकांच्या मतांचा आदर, एकमेकांना पाठिंबा देणं आणि ज्याला शहरापेक्षा जंगल आवडत असेल माझ्या अॅडव्हेंचर स्पिरीट त्याला पटत असतील तोच माझा पार्टनर असेल.'10 / 10ती म्हणाली,'माझा पार्टनर आर्टिस्ट असावा. लेखक, अभिनेता, चित्रकार किंवा गायक असा. चुकीच्या व्यक्तीसोबत असण्यापेक्षा एकटं राहणं काय वाईट. इतक्या वर्षात एकटं राहण्याची मजा यायला लागली आहे. त्यामुळे वाट बघायला हरकत नाही.' आणखी वाचा Subscribe to Notifications