Join us

हनिमूनसाठी व्हिएतनाममध्ये गेली 'ही' मराठमोळी जोडी, अभिनेत्रीचं बिकीनी फोटोशूट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 11:37 AM

1 / 8
'कन्यादान' मालिकेतून लोकप्रिय झालेली अमृता बने (Amruta Bane) आणि शुभंकर एकबोटे (Shubhankar Ekbote) ही जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकली. २१ एप्रिल रोजी त्यांचं थाटामाटात लग्न झालं. लग्नानंतर दोघंही आता हनिमून एन्जॉय करत आहेत.
2 / 8
अमृता बनेने अनेक मराठी मालिकांमध्ये आतापर्यंत काम केले आहे. दरम्यान 'कन्यादान' या मालिकेत काम करत असतानाच तिची आणि शुभंकर एकबोटेची ओळख झाली. मालिकेत दोघांची जोडी होती जी नंतर खऱ्या आयुष्यातही जमली.
3 / 8
हनिमूनसाठी त्यांनी व्हिएतनाम देशाची निवड केली. तेथील दोघांचे रोमँटिक फोटो, व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यातील एका पोस्टमध्ये अमृताचा हॉट अवतार बघायला मिळतोय.
4 / 8
त्यांच्या लग्नाला काही दिवस पूर्ण झाले असून दोघंही आता व्हिएतनाम येथे हनिमूनसाठी गेले आहेत. अमृताने निऑन रंगाची बिकीनी घातली असून यामध्ये ती भलतीच हॉट दिसत आहे.
5 / 8
तर आणखी एका पोस्टमध्ये हॉटेलमधील रुममध्ये ते कोझी झाले आहेत. यातही अमृताचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक दिसून येतोय. तसंच क्रुझवरही त्यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय.
6 / 8
व्हिएतनामच्या गल्ल्यांमध्ये त्यांनी छान फोटोशूट केल्याचं दिसत आहे. 'रोमान्स शोमान्स इन व्हिएतनाम' असं कॅप्शन अमृताने दिलं आहे.
7 / 8
शुभंकर हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवत शुभंकरनेही मराठी सिनेइंडस्ट्रीत स्वतःची ओळख बनवलीय. लवकरच तो 'छावा' या विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमात दिसणार आहे.
8 / 8
अमृता बनेनं सातव्या मुलीची सातवी मुलगी, कन्यादान, रंग माझा वेगळा आणि वैजू नंबर 1 या मालिकांमध्ये काम केलं आहे.
टॅग्स :मराठी अभिनेताव्हायरल फोटोज्सोशल मीडियाटिव्ही कलाकारलग्न