Join us  

गणेशोत्सवासाठी अभिनेत्री रुचिरा जाधव पोहोचली कोकणात: फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 1:49 PM

1 / 9
सध्या घराघरांमध्ये, मंडपांमध्ये विराजमान झालेले गणराय आणि त्यांच्या पाठोपाठ आलेल्या माहेरवाशीण गौराईंमुळे सगळीकडे उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण आहे.
2 / 9
गणेशाचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र उत्साह, जल्लोषाने वातावरण भारावून गेले आहे. प्रत्येक जण आपापल्यापरीने गणेशाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे.
3 / 9
अशातच अभिनेत्री रुचिर जाधव यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात चिपळूणला गेल्याचं पाहायला मिळतंय. त्याचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
4 / 9
गणेशोत्सवात कोकणात भक्तीमय उल्हासाचे वातावरण असते. गणपतीसाठी मोठ्या संख्येने कोकणवासी आपल्या गावाकडे जातात. रुचिरासह तिचे कुटुंबिय देखील गावी कोकणात आले आहेत.
5 / 9
'बाप्पा म्हणाला, पुढच्या वर्षी नाही.. याच वर्षी ये, बाप्पांसाठी आणि माझ्या पप्पांसाठी.. गेलेच' असं भलमोठं कॅप्शन लिहित तिने इन्स्टागारमवर फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये रुचिरा तिच्या आई-बाबांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे.
6 / 9
मराठी कलाविश्वातील बिनधास्त अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधव ओळखली जाते.
7 / 9
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत तिने मायाची नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेने खऱ्या अर्थाने तिला नवी ओळख मिळवून दिली.
8 / 9
शिवाय 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात रूचिराने बिग बॉसचं घर दणाणून सोडलं होतं.
9 / 9
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘प्रेम हे’, ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’ अशा मालिकांमध्येही ती झळकली.
टॅग्स :टिव्ही कलाकारगणेश चतुर्थी २०२४सोशल मीडियाकोकणचिपळुणव्हायरल फोटोज्