By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:41 IST
1 / 8'ओळख', 'का रे दुरावा, 'एक घर मंतरलेलं, अशा मालिंकामधून काम करत तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.2 / 8अलिकडेच ती झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत झळकली.3 / 8दरम्यान, सुरुची अभिनयातून थोडा ब्रेक घेत सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लूटताना दिसते आहे.4 / 8नुकतेच सोशल मीडियावर सुरुचीने तिच्या व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.5 / 8या फोटोंमध्ये अभिनेत्री मेघालयामध्ये जाऊन सफरनामा करत असल्याची पाहायला मिळतेय.6 / 8ईशान्य भारतातील निसर्गसौंदर्याचा अद्भुत खजिना असलेल्या मेघालयातील शिलॉंग व्हॅलीमध्ये ती भ्रमंती करते आहे.7 / 8सुरुची अडारकरच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 8 / 8'प्रवास म्हणजे माझा आनंद...' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.