Join us

सुभेदारांच्या सोज्वळ सूनेचा ग्लॅमरस अंदाज; 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरीचं नवं फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 12:00 PM

1 / 7
सध्याच्या घडीला मराठी मालिकाविश्वातील आघाडीची नायिका म्हणून जुईकडे पाहिलं जातं.
2 / 7
आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने चाहत्यांना आपलंस केलं आहे.सोशल मीडियावरही अभिनेत्रीचा भलामोठा चाहतावर्ग आहे.
3 / 7
सध्या जुई 'ठरलं तर मग' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.
4 / 7
शिवाय मालिकेतील तिची सायली सुभेदार नावाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावते आहे.
5 / 7
नुकतेच जुई गडकरीने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.
6 / 7
आकाशी रंगाचा सुंदर ड्रेस त्यावर ऑक्साईड ज्वेलरी अशा लूकमध्ये अभिनेत्री पाहायला मिळतेय.
7 / 7
या फोटोंमध्ये जुईचं सौंदर्य खुललं आहे. 'आता होऊ द्या धिंगाणा सीझन-३' च्या आगामी एपिसोडमध्ये जुई पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तिने हा लूक केला आहे.
टॅग्स :जुई गडकरीटेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्