Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो...! मराठमोळ्या या अभिनेत्रीचं १३ वेळा झालंय लग्न, आता म्हणतेय परत थाटामाटत लग्न करण्यात नाही रस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 13:35 IST

1 / 8
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर (Isha Keskar). 'जय मल्हार'च्या माध्यमातून ईशा घराघरात पोहोचली. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने सिनेइंडस्ट्रीत तिचे हक्काचे स्थान निर्माण केले. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचे पाहायला मिळते.
2 / 8
ईशा केसकरच्या प्रोफेशनल लाइफविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, नुकतेच एका मुलाखतीत तिने तिच्या खासगी आयुष्यावर भाष्य केले.
3 / 8
ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल आहेत. ते दोघे सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या नात्याला आता सहा वर्षे पूर्ण झाली आहेत.
4 / 8
ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतात आणि या जोडीला नेहमीच लग्नाबद्दल प्रश्न विचारले जातात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ईशाने तिच्या लग्नाबद्दल सांगितले.
5 / 8
ईशा आणि ऋषीला अनेकदा लग्नाबद्दल विचारलं जातं. पण इतक्यात तरी लग्नाचा काही विचार नसल्याचे ईशाने सांगितले. तिने अनेक मालिका, चित्रपटात झळकली आहे. या मालिकांमध्ये किंवा सिनेमात लग्नात अनेकदा तिचे लग्न झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा थाटामाटात लग्न करण्याची तिची इच्छा नाही, असे ती सांगते.
6 / 8
ईशा केसकर म्हणते, माझे आधीच १३ वेळा लग्न झाले आहे, त्यामुळे पुन्हा तसेच थाटामाटत लग्न करण्याची अजिबातच इच्छा नाही. तसेच या मुलाखतीत तिने तिच्या बालपणापासून ते कॉलजच्या दिवसातल्या अनेक आठवणी शेअर केल्या आहेत.
7 / 8
आई वडिलांच्या लग्नाच्या बऱ्याच वर्षांनी ईशाचा जन्म झाला. त्यामुळे जेव्हा ती १० वर्षांची होती, तेव्हा तिच्या वडिलांचे वय ५० होते. सहा महिन्यापासूनच ती पाळणाघरात वाढली आहे. तसेच नंतर कॉलेजच्या निमित्ताने ती बाहेर राहत होती. त्यामुळे आई-वडिलांचा सहवास तिला खूप कमी मिळाला.
8 / 8
या मुलाखतीत ईशा केसकरने तिच्या वडिलांच्या कॅन्सर उपचारांबद्दल सांगितले. त्यांच्या उपचारांसाठी वेळ मिळाला नाही. कॅन्सरचे निदान झाले आणि काही महिन्यात त्यांचे निधन झाले, असे तिने सांगितले.
टॅग्स :ईशा केसकरऋषी सक्सेना