Join us

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम गुड्डी नेमकी कोण आहे माहितीये का? यापूर्वी केलंय 'या' मालिकेत काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 2:59 PM

1 / 8
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ.
2 / 8
या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
3 / 8
यश, नेहा, परी यांच्यासोबतच या मालिकेतील आणखी एक अभिनेत्री लक्षवेधी ठरते ती म्हणजे गुड्डी.
4 / 8
नेहाच्या चाळीत राहणारी गुड्डी तिच्या मस्तीखोर स्वभावामुळे कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. त्यामुळेच ही भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.
5 / 8
मालिकेत गुड्डीची भूमिका अभिनेत्री प्रणाली ओव्हाळ साकारत आहे.
6 / 8
प्रणालीला लहानपणापासून अभिनयाची आवड असून तिचं शालेय शिक्षण आयइएस दिगंबर पाटकर शाळेतून झालं आहे. तर, महाविद्यालयीन शिक्षण सिद्धार्थ कॉलेजमधून
7 / 8
प्रणालीने कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे.
8 / 8
माझी तुझी रेशीमगाठ पूर्वी ती डॉक्टर डॉन या मालिकेत झळकली आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन