Join us

वयाच्या 39 वर्षी लग्न केल्यानंतर आई बनण्यास इच्छुक नाही मोना सिंह, बेबी प्लान‍िंगबद्दल पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 7:47 PM

1 / 10
लग्नानंतर फॅमिल प्लॅनिंगबद्दलही ती पहिल्यांदाच इतक्या मनमोकळेपणाने बोलली. सध्या तरी मुल नको असल्याचे तिने म्हटले आहे. यात जास्त घाई करणार नसल्याचे तिने सांगितले आहे.
2 / 10
आई बनण्याबाबत तिने सांगितले की, माझ्या बाळाला मी कधी जन्म देणार याविषयी मी आधीपासूनच विशेष तयारी करुन ठेवली आहे.
3 / 10
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार मोना सिंह प्रजननासाठी काही वर्षाआधीच अंडी फ्रीझिंग करुन ठेवल्याचा खुलासा तिने केला आहे. त्यामुळे जेव्हा कधी मी आई होण्याचा निर्णय घेईल तेव्हा वाढत्या वयामुळे गरोदरपणात कोणतीही समस्या उद्भवणार नाही. मी पूर्णपणे मुक्त आहे.
4 / 10
मी वयाच्या 34 व्या वर्षी हे केले होते. कारण आता माझं लग्न झालं आहे, मला माझ्या जोडीदाराबरोबर वैवाहीक आयुष्य एन्जॉय करायचे आहे. त्याच्याबरोबर जगभर फिरायचं आहे.
5 / 10
आतापर्यंत मी कुटुंबीय आणि मित्रांसह फिरत होतो, आता मला माझ्या पतीसह जगाची भ्रमंती करायची आहेय आणि आता एक वेगळीच भावना आहे, जरी मला मुलं आवडत असली तरी मी यासाठी अद्याप तयार नाही. मी याबद्दल नंतर विचार करेन '.
6 / 10
'जेव्हा मी गरोदर होण्यासाठी अंडी फ्रिंजींगचा निर्णय घेतला तेव्हा हे ऐकून माझ्या आईला आनंद झाला. आम्ही पुण्यातील स्त्रीरोगतज्ञाकडे गेलो आणि त्यासाठी योग्य उपचारानुसार मी हे करून घेतले. मला माझ्या कामापासून काही महिने विश्रांती घ्यावी लागली कारण या प्रक्रियेमध्ये बरीच मूड स्विंग होतात.
7 / 10
मोना सिंहने लग्नानंतरच्या बदलांविषयीही चर्चा केली. 'मी इतक्या दिवसांपासून माझ्या आईवडिलांबरोबर राहत होते. लग्नानंतर मी आत्मनिर्भर बनली आहे, माझे काम स्वतःच करते. लग्नानंतर, डिसेंबरमध्ये मी माझ्या पतीबरोबर शिफ्ट झाली. तेव्हाही मी घरी नव्हते, मी लालसिंग चड्ढासाठी शूट करत होते.
8 / 10
'संपूर्ण जानेवारी-फेब्रुवारी मी त्याच्याबरोबर नव्हतेच. मार्चमध्ये लॉकडाऊनमुळे आम्ही एकत्र राहू लागलो. यावेळी मी बर्‍याच चांगल्या गोष्टी अनुभवल्या. लग्नाआधी मी माझा मित्र गौरव गेरासोबत फिरायची. आणि आता माझ्या पतीबरोबर एन्जॉय करते, जो केवळ एक चांगला साथीदारच नाही, तर तो माझे ऐकतोही.
9 / 10
मोनाचा पती श्याम गोपालन हे बँकर आहेत. आपल्या पतीची प्रशंसा करताना मोना म्हणाली- 'आम्ही दोघेही एकमेकांची काळजी घेतो. लग्नानंतर आमचे नाते अधिक घट्ट झाले आहे इतकेच नाही तर आम्ही दोघेही तितकाच एकमेकांचा आदर करतो'.
10 / 10
मोना सिंह लवकरच आमिर खानसह 'लालसिंग चड्ढा' चित्रपटात दिसणार आहे. आमिर आणि करीना कपूरसोबत मोनाचा हा दुसरा चित्रपट आहे. हे तिघेही यापूर्वी 'थ्री इडियट्स' या चित्रपटात दिसले आहेत.
टॅग्स :मोना सिंग