Join us

मराठमोळी थोडीशी साधी भोळी! मृणाल दुसानिसचा मनमोहक लूक, शेअर केले खास Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 2:26 PM

1 / 7
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' ही 2010 साली आलेली मालिका सगळ्यांनाच आठवत असेल. १४ वर्षांपूर्वी या मालिकेतून मृणाल दुसानिसल(Mrunal Dusanis) आणि अभिजीत खांडकेकर हे दोन्ही कलाकार घराघरात पोहोचले.
2 / 7
मृणाल दुसानिसने तिच्या साधेपणाने सर्वांच्या मनात घर केलं. या मालिकेनंतर ती पुढे काही मालिकांमध्ये दिसली. 'तू तिथे मी','अस्सं सासर सुरेख बाई','हे मन बावरे' यात ती झळकली.
3 / 7
२०१८ साली तिने नीरज मोरेशी लग्नगाठ बांधली आणि ती अमेरिकेला शिफ्ट झाली. 'हे मन बावरे' मालिका सुरु असतानाच तिचं लग्न झालं होतं. 2022 मध्ये तिने मुलीला जन्म दिला.
4 / 7
मृणाल आता ६ वर्षांनी भारतात परत आली आहे. इतकंच नाही तर तिने अभिनय क्षेत्रातही कमबॅक केलं आहे. स्टार प्रवाहवरील आगामी एका मालिकेत ती झळकणार आहे. स्टार प्रवाहच्या गणेशोत्सव कार्यक्रमात ती सहकलाकारांसोबत दिसली.
5 / 7
मृणालने तिच्या पारंपरिक लूकमधले फोटो शेअर केले आहेत. काठापदराची पिवळा ब्लाऊज, हिरवी साडी, साजेसे दागिने, नथ, केसात गजरा अशा लूकमध्ये ती दिसली.
6 / 7
'काहीतरी नवीन' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 'अजूनही होती तशीच साधी-सालस दिसते' अशा कमेंट्स मृणालला आल्या आहेत.
7 / 7
मृणालला पुन्हा पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. अद्याप मालिकेबद्दल कोणतीही अधिक माहिती समजलेली नाही. मृणाल लवकरच याचा खुलासा करणार आहे.
टॅग्स :मृणाल दुसानीसमराठी अभिनेतास्टार प्रवाहटेलिव्हिजन