Join us

अभिनेत्री नसती तर मृणाल दुसानीस या क्षेत्रात असती कार्यरत, म्हणाली- "या व्यतिरिक्त..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 12:52 IST

1 / 9
लग्नानंतर अभिनेत्री मृणाल दुसानीस (Mrunal Dusanis) हिने अभिनयातून ब्रेक घेतला आणि ती तिच्या नवऱ्यासोबत अमेरिकेत स्थायिक झाली होती.
2 / 9
त्यानंतर आता तब्बल चार वर्षांनंतर अभिनेत्री भारतात परतली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. नुकतेच तिने लोकमत फिल्मीच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती.
3 / 9
यावेळी तिने अभिनेत्री नसती तर कोणत्या क्षेत्रात कार्यरत असती हे सांगितले.
4 / 9
ती म्हणाली की, अभिनेत्री नसती तर मी पत्रकारच झाले असते. खरेतर मी जॉबच करत होते व्यवस्थित. पण मी ते नाही करू शकले कारण मी अभिनय क्षेत्राकडे वळले. पण या व्यतिरिक्त मी दुसरं काहीच करू शकले नसते.
5 / 9
गायला आवडतं पण मी थोडंच शिकले आहे गाणं. त्यामुळे ते देखील माझं प्रोफेशन होऊ शकलं नसतं, असे मृणाल म्हणाली.
6 / 9
ती पुढे म्हणाली की, तशा मग आवडीनिवडी बऱ्याच आहेत. खायला आवडते. पुस्तक वाचायला आवडतात. तसे तर माझे छंद पण खूप आहेत.
7 / 9
मला गायनाची आवड आहे. मी कथ्थक शिकले आहे. पण यापैकी कोणतीच गोष्ट माझे प्रोफेशन झाले नसते. पत्रकारिताच केली असती किंवा मग अभिनय, असे तिने या मुलाखतीत सांगितले.
8 / 9
9 / 9
याच मुलाखतीत मृणालने ती लवकरच अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार असल्याचे सांगितले आहे.
टॅग्स :मृणाल दुसानीस