PHOTOS: एखाद्या अभिनेत्या इतकाच हॅण्डसम आहे मृण्मयी देशपांडेचा नवरा, कलाविश्वाऐवजी या क्षेत्रात आहे कार्यरत By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 1:11 PM1 / 9सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते. आज आपण अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत. (Photo Instagram) 2 / 9 कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयी देशपांडे जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. (Photo Instagram) 3 / 9नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.(Photo Instagram) 4 / 9मृण्मयी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo Instagram) 5 / 9मृण्मयी अनेकवेळा पतीसोबतचे रोमाँटिक फोटो शेअर करत असते. फोटोंमधून दोघांमधले बॉन्डिंग नेहमी दिसते.(Photo Instagram)6 / 9मृण्मयीच्या पतीचं नाव स्वप्निल राव आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिचा पती स्वप्नील राव ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील अनुरूप जोडी समजली जाते.(Photo Instagram)7 / 9३ डिसेंबर २०१६ रोजी व्यावसायिक स्वप्निल रावसह मृण्मयी रेशीमगाठीत अडकली होती.(Photo Instagram)8 / 9स्वप्नील मृण्मयीला बघायला गेला होता त्यावेळी मृण्मयीला पाहताक्षणीच त्याला तिच्यावर प्रेम झाले होते.मृण्मयी स्वप्निल या दोघांचेही स्वभावही खूप मिळते जुळते आहेत..(Photo Instagram)9 / 9स्वप्नील रावचा चित्रपटसृष्टीशी काहीच संबंध नाही. तो एक बिझनेसमन आहे. मृण्मयी आणि स्वप्नीलचा सुखी संसार सुरू आहे.(Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications