Myra Vaikul : छान किती दिसते! छोट्या परीचा क्यूट अंदाज, मावशीच्या लग्नात मायराचीच चर्चा By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 4:46 PM1 / 9माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून प्रसिद्धीस आलेली छोटी परी म्हणजेच मायरा वायकूळचे इतक्या लहान वयातच खूप चाहते आहेत.2 / 9तिचे क्यूट फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होतात. इतक्या कमी वयात ती अगदी प्रोफेशनल असल्यासारखे फोटोशूट करते.3 / 9सध्या मायरा कुटुंबासोबत नाशिकला गेली आहे. तिच्या कुटुंबात लग्नसोहळा असल्याने ती नाशिकमध्ये एंजॉय करत आहे. 4 / 9मायराचे मेहंदी फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. अगदी निरागस, सोज्वळ असा तिचा लुक दिसून येतोय. 5 / 9हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस तिने परिधान केला आहे. पांढऱ्या रंगाची ओढणी घेतली आहे. केसांना दोन क्लिप्स लावल्या आहेत. 6 / 9मायरा अगदी तिच्या आईसारखी दिसत असल्याची कमेंट नेटकरी करत आहेत. तिच्या फोटोंवर कायमच चाहते घायाळ होतात. 7 / 9मायराने फोटोसाठी दिलेल्या पोज सुद्धा अतिशय गोड आहेत. मोठ्या अभिनेत्री देतात तशा काहीशा पोज तिने दिल्याचं दिसतं. 8 / 9मायराची गोड स्माईल, तिचा क्युट चेहरा आणि सुंदर ड्रेसमध्ये तिच्यावरुन नजरच हटणार नाही.9 / 9आता लग्नाचे आणखी फोटो कधी येतात याकडे मायराच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications