Join us

'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 8:57 AM

1 / 7
टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सुरभीने बॉयफ्रेंड सुमित सुरीसह सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली.
2 / 7
उत्तराखंडमध्ये सुरभी आणि सुमितचा शाही विवाहसोहळा पार पडला. याचे फोटो सुरभीने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
3 / 7
लग्नासाठी सुरभीने खास लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यात ती खूपच सुंदर दिसत होती.
4 / 7
तर सुमीत सुरीने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. या नवविवाहित कपलने लग्नानंतर फोटोसाठी पोझही दिल्या.
5 / 7
सुरभी आणि सुमीतच्या लग्नातील काही खास क्षणांच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहत्यांनी या दोघांनाही नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
6 / 7
२७ ऑक्टोबर, रविवारी सुरभी आणि सुमीत कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नाच्या बेडीत अडकले.
7 / 7
सुरभी हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. सुरभीने 'नागिन', 'कबुल है', 'कोई लौट के आया है', 'इश्कबाज' अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंग