Join us

Navratri 2024: आरस्पानी सौंदर्य! अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या फोटोंची होतेय चर्चा, नेटकरी घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 1:06 PM

1 / 7
मृणाल दुसानिस ही मराठी मनोंरजन विश्वातील नावाजलेली नायिका आहे.
2 / 7
लग्नानंतर गेली अनेक वर्षे अभिनेत्री अमेरिकेत राहत असल्यामुळे तिने अभिनयातून ब्रेक घेतला होता.
3 / 7
लवकरच मृणाल अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
4 / 7
दरम्यान, नुकतंच अभिनेत्रीने स्टार प्रवाह नवरात्रोत्सवानिमित्त खास फोटोशूट केल्याचं पाहायला मिळत आहे.
5 / 7
नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी मृणालने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसून सुंदर असे फोटो क्लिक केलेत.
6 / 7
फोटोंमध्ये मृणालचं खुललेलं सौंदर्य पाहून चाहत्यांनी तिच्यावर कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
7 / 7
गुलाबी नऊवारी, हातात हिरवा चुडा अशा लूकमध्ये अभिनेत्री दिसते आहे. मृणालचा हा पारंपरिक अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.
टॅग्स :मृणाल दुसानीसनवरात्रीटिव्ही कलाकारसोशल मीडियाव्हायरल फोटोज्