Join us  

९ महिने बेरोजगार, पैशांसाठी स्ट्रगल; इंटिमेट सीन्सने चर्चेत आलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 3:03 PM

1 / 10
अभिनेत्री निया शर्मा ही एक लोकप्रिय टीव्ही स्टार आहे. तिने अनेक शोमध्ये काम केलं आहे. निया तिचा अभिनय आणि बोल्ड फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. पण नियाने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष केला आहे.
2 / 10
अभिनेत्रीने सांगितलं की, आपलं पेमेंट मिळवण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला आहे. बॉलिवूड बबलशी संघर्षाच्या दिवसांबद्दल बोलताना निया म्हणाली होती, 'आपण खूप मेहनत करतो आणि मग आपलेच पैसे आपल्याला मागावे लागतात.'
3 / 10
'मी यातून गेले आणि लढले. तुम्ही माझा बालिशपणा म्हणू शकता की आणखी काही... मी स्टुडिओबाहेर उभी राहायचे. माझे पैसे मिळेपर्यंत मी काम करणार नाही.'
4 / 10
'होय, मी अल्टिमेटम दिला. कारण पेमेंट घेण्याचा दुसरा मार्ग नव्हता. मला भीक मागणं, विनवणी करणं आणि रडण्यास भाग पडलं गेलं.'
5 / 10
'एक हजारों में मेरी बेहना है पासून जमाई राजा मिळेपर्यंत ९ महिन्यांचं अंतर होतं. मी मुंबईत एकटीच होते. मला मित्र नव्हते. मी नवीन होते. मी स्वतःमध्येच गुंग असायची.'
6 / 10
'मी स्वतःवर काम केलं. त्यानंतर मी बेली डान्स शिकले. ९ महिने गेले आणि मला कळलं की कोणतंही काम नाही. काहीच नव्हतं, एक रुपयाही नव्हता. मित्र नव्हते. मला वाटतं की, तो असा काळ होता जो मला पुन्हा जगायचा नाही.'
7 / 10
निया शर्माने काली-एक अग्निपरीक्षा, बहन, एक हजारों में मेरी बहना है, जमाई राजा, खतरों के खिलाडी ८, इश्क में मरजावां, नागिन ४, सुहागन चुडैल सारखे शो केले आहेत.
8 / 10
नियाने ट्विस्टेड या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. या मालिकेत अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहायला मिळाला. नियाचे लाखो चाहते आहेत.
9 / 10
निया लिपलॉक आणि इंटिमेट सीन देऊन चर्चेत आली. आजकाल ती लाफ्टर शेफ्स-अनलिमिटेड एंटरटेनमेंटमध्ये दिसत आहे. निया सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
10 / 10
टॅग्स :निया शर्माटिव्ही कलाकार