Join us  

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत बांधली जाणार नित्या-अधिराजची सात जन्मांची गाठ, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 2:49 PM

1 / 7
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत सध्या नित्या - अधिराजच्या लग्नाची धामधूम सुरु आहे
2 / 7
नित्या - अधिराजच्या पारंपरिक लूकमधील लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
3 / 7
नित्या - अधिराजची भूमिकेत अनुक्रमे अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव दिसत आहेत
4 / 7
नित्या - अधिराजच्या लग्नासाठी खास फोटोशूट केलं. या फोटोशूटला लोकांची पसंती मिळालीय
5 / 7
नित्याने हिरव्या - लाल रंगाची साडी तर अधिराजने गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केलाय
6 / 7
नित्या-अधिराज या दोघांनीही मुंडावळ्या बांधल्या असून जोडा एकमेकांना शोभून दिसतोय
7 / 7
नित्या-अधिराजच्या लग्नाचा दोन तासांचा विशेष भाग रविवार ७ जुलैला दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर बघायला मिळेल
टॅग्स :मराठीमराठी अभिनेताटेलिव्हिजन