किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकरच नाही तर मराठी कलाविश्वातील हे ६ जोडपे बांधणार लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते? By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 04:57 PM 2024-12-10T16:57:35+5:30 2024-12-10T17:11:55+5:30
सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई पाहायला मिळत आहे. नुकतेच रेश्मा शिंदेने बॉयफ्रेंड पवनसोबत लग्न केले. त्यानंतर आता आणखी काही कलाकार लग्नबेडीत अडकणार आहेत. सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई पाहायला मिळत आहे. नुकतेच रेश्मा शिंदेने बॉयफ्रेंड पवनसोबत लग्न केले. त्यानंतर आता आणखी काही कलाकार लग्नबेडीत अडकणार आहेत.
हेमल इंगळेचा काही महिन्यांपूर्वी साखरपुडा पार पडला. त्यानंतर तिच्या बॅचरल पार्टीचीही नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली. अशातच आता अभिनेत्रीच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत. ती लवकरच रोनकसोबत लग्न करणार आहे.
आई कुठे काय करते मालिकेत आरोहीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कौमुदी वलोकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत.
१९ डिसेंबर, २०२१ मध्ये दिव्या पुगावकर हिचा तिलक समारंभ पार पडला होता. ती अक्षय घरत सोबत लग्न करणार आहे. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही.
'बिग बॉस मराठी' फेम 'कोकण हार्टेड गर्ल' उर्फ अंकिता प्रभू वालावलकर देखील लग्नगाठ बांधणार आहे. संगीत दिग्दर्शक कुणाल भगत याच्यासोबत सातफेरे घेणार आहे.
अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि श्रेया डफळापूरकर लवकरच लग्न करणार आहेत. श्रेयाच्या ग्रहमखचे फोटो समोर आले आहेत.
अभिनेता अंबर गणपुळे अभिनेत्री शिवानी सोनारशी लग्न करणार आहे. नुकतीच अंबर आणि शिवानी यांची बॅचलर पार्टी झाली.
किरण गायकवाड अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबर १४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे.