तुझ्यात जीव रंगला! 'व्हॅलेंटाईन डे' च्या निमित्ताने राणादाची पाठकबाईंसाठी खास पोस्ट, म्हणतो... By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 5:12 PM1 / 7अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. 2 / 7झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणा आणि अंजलीची भूमिका साकारत हे जोडपं घराघरात पोहोचलं. त्यात त्यांनी साकारलेल्या पाठक बाईंच्या आणि राणादाच्या जोडीने चाहत्यांना वेडच लावलं.3 / 7हार्दिक जोशी तसेच अक्षया देवधर २ डिसेंबर २०२२ मध्ये लग्न बंधनात अडकले. पाठकबाई आणि राणादाने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधल्याने चाहतेही आनंदी होते. खरंतर छोट्या पडद्यावरील मालिकेतून या जोडीला लोकप्रियता मिळाली. 4 / 7आज 'व्हॅलेंटाईन डे' च्या निमित्ताने हार्दिक जोशीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नी अक्षयासाठी खास पोस्ट केली आहे. हार्दिकच्या या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.5 / 7अक्षयासोबतच्या काही रोमॅंन्टिक फोटोंची मालिका शेअर करत त्याने त्यावर सूचक असं कॅप्शन लिहलंय. 6 / 7'Celebrating the love that grows stronger with each passing day. Happy Valentine's Day, my beautiful wife! 💖' असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलंय. 7 / 7तर अक्षयाने देखील तिच्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव केलाय. आणखी वाचा Subscribe to Notifications