'जुळून येती रेशीमगाठी' नाही तर 'ही' होती प्राजक्ताची पहिली मालिका, ओळखलंत का? By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 9:13 AM1 / 9'जुळून येती रेशिमगाठी' मालिकेतून प्रेक्षकांना प्रेमात पाडणारी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आज ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. प्राजक्ताचा भला मोठा चाहतावर्ग आज प्राजूच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.2 / 9प्राजक्ता माळीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि गोड हास्याने संपूर्ण महाराष्ट्रालाच प्रेमात पाडलं. तरुणांची तर ती क्रश झाली. तिचं हसणंही गोड, दिसणंही सुंदर आणि पहिल्याच मालिकेतून तिने केलेला अभिनयही अप्रतिम. अल्पावधीतच ती मराठी मनोरंजनसृष्टीतील मोठं नाव झाली. 3 / 9प्राजक्ताला खरी ओळख 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून मिळाली असली तरी तिची पहिली मालिका दुसरीच होती. 2010 साली आलेल्या 'फिरुनी नवी जन्मेन मी' मालिकेतून तिने अभिनयाला सुरुवात केली होती. नंतर 'बंध रेशमांचे' मालिकेतही तिने काम केले. यानंतर 2013 साली तिला 'जुळून येती रेशीमगाठी'मध्ये मुख्य भूमिका ऑफर झाली.4 / 9'जुळून येती रेशिगाठी' नंतर प्राजक्ताने 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' या मालिकेतही काम केलं. ही मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. फक्त अभिनयच नाही तर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत तिने आपण कशातच कमी नाही हे दाखवून दिलं.5 / 9प्राजक्ताच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चाहत्यांना नेहमीच जाणून घ्यायचं असतं. प्राजू लग्न कधी करणार हा तर अगदी नेहमीचाच प्रश्न होऊन लागलाय.कित्येक जणांनी तिच्या फोटोंवर कमेंट्समध्ये थेट तिला प्रपोजही केलं आहे. प्राजक्ताने तिच्या लव्हलाईफबद्दल स्वत:च लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता.6 / 9तू पहिल्यांदा कोणाला प्रपोज केलं होतं का? या प्रश्नावर प्राजक्ता म्हणाली,'मी नक्कीच प्रपोज केलं आहे. मलाच प्रपोज करावं लागलं होतं कारण माझ्या आजुबाजूला जी मुलं होती ती फारच साधी, सरळ होती. मी त्यांना थेट प्रपोज नाही केलं पण तू बरा वाटतोस, चल बघू काही होतंय का, असं मी त्याला म्हणाले होते.'7 / 9प्राजक्ताला सलमान खान आवडायचा. तिला त्याच्याशी लग्नही करायचं होतं. खरंतर लहानपणी तिच्या आतेभावाचा सलमान खान आवडीचा अभिनेता होता. त्यानेच प्राजक्ताला सलमानशी लग्न करायचंय असं म्हणायची सवय लावली असा किस्सा तिने सांगितला होता.8 / 9प्राजक्ताने मालिकांशिवाय अनेक सिनेमा आणि वेबसिरीजमध्येही काम केले. 'हम्पी','खो-खो','पार्टी','लकडाऊन बी पॉझिटिव्ह','पांडू' या काही चित्रपटांमध्ये काम केले. तर 'रानबाजार' या वेबसिरीजमध्ये तिने साकारलेल्या बोल्ड भूमिकेने सर्वांचंच लक्ष वेधलं.9 / 9प्राजक्ताने स्वत:चा ज्वेलरी ब्रँडही सुरु केला आहे. 'प्राजक्तराज' नावाने ती मराठमोळ्या पारंपारिक दागिन्यांची विक्री करते. तर नुकतंच तिने कर्जत येथे स्वत:चा फार्महाऊस घेतला आहे. 'प्राजक्तप्रभा' नावाने तिने काव्यसंग्रहही सुरु केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications