Join us  

पार्टी एरिया, गार्डन, स्विमिंगपूल अन्...; प्राजक्ता माळीच्या कर्जतमधील आलिशान फार्महाऊसचे Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 7:02 PM

1 / 9
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करत असते. प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. प्राजक्ता अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. प्राजक्ताने कर्जतमध्ये घर घेतल्याची बातमी चाहत्यांना दिली होती.
2 / 9
काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताचा वाढदिवसही झाला. हास्यजत्रेच्या टीमकडून तिच्या कर्जतच्या फार्महाऊसवर वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यात आलं. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर करत हास्यजत्रा फेम वनिता खरातने प्राजक्ताच्या कर्जतमधील फार्महाऊसची झलकही दाखवली आहे.
3 / 9
प्राजक्ताने कर्जतच्या फार्महाऊसला ‘प्राजक्तकुंज’ असं नाव दिलं आहे. निसर्गाच्या सानिध्यात हिरव्यागार परिसरात प्राजक्ताचं हे फार्महाऊस आहे. तिच्या फार्महाऊसमध्ये एन्ट्री करण्यासाठी एक मोठा गेटही बनवण्यात आला आहे.
4 / 9
या फार्महाऊसमध्ये प्रशस्त हॉल आहे. या हॉलमध्ये सोफा सेट ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच हॉलमधील एका कोपऱ्यात देव्हाराही ठेवण्यात आला आहे. यामध्ये गणपतीची मूर्ती ठेवण्यात आली आहे.
5 / 9
प्राजक्ताच्या या फार्महाऊसमध्ये तीन प्रशस्त बेडरुम आहेत. या बेडरुमला गॅलरीही आहे. आजूबाजूच्या सुंदर निसर्गाच दर्शन बेडरुमच्या या गॅलरीतून होतं.
6 / 9
या फार्महाऊसमध्ये किचन खास पद्धतीने डेकोरेट करण्यात आलं आहे. या किचनमध्ये फर्निचर केल्याचंही दिसत आहे. त्याबरोबरच डायनिंग टेबलही ठेवण्यात आला आहे.
7 / 9
प्राजक्तकुंजमधील सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे स्विमिंगपूल आणि पार्टी एरिया. प्राजक्ताच्या या फार्महाऊसमध्ये मोठं स्विमिंगपूल आहे. या स्विमिंगपूलला लागूनच पार्टी एरिया डेकोरेट करण्यात आला आहे.
8 / 9
याबरोबरच प्राजक्ताच्या फार्महाऊसला निसर्गरम्य अशा गार्डनने चार चांद लावले आहेत. या गार्डनमध्ये कॅम्प फायरसाठीही विशेष सोय करण्यात आली आहे.
9 / 9
प्राजक्ताने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून ती घराघरात पोहोचली. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
टॅग्स :प्राजक्ता माळीमराठी अभिनेतामहाराष्ट्राची हास्य जत्रा