Join us  

हिरवेगार डोंगर, झुळझुळ वाहणारं पाणी, निसर्गरम्य ठिकाणी आहे प्राजक्ता माळीचं फार्महाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 4:50 PM

1 / 11
प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आज ती ३५वा वाढदिवस साजरा करते आहे.
2 / 11
प्राजक्ता अभिनेत्रीसोबत उत्तम कवयित्री आणि उद्योजिका आहे. प्राजक्तराज नामक पारंपारिक दागिन्यांचा तिचा व्यवसाय आहे.
3 / 11
प्राजक्ताने अलिकडेच कर्जतमध्ये निसर्गरम्य वातावरणात फार्महाऊस घेतले आहे.
4 / 11
प्राजक्तकुंज असे तिच्या फार्महाउसचं नाव आहे. कर्जतमधील गौळवाडी या गावात प्राजक्ताचं फार्महाऊस आहे. यात ३ बेडरूम, ४ बाथरूम आणि लिव्हिंग रुम आहे.
5 / 11
प्रशस्त असा लिव्हिंग रूम देण्यात आला आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या फार्महाऊसच्या बाहेर फॅमिली लंच करण्यासाठी जागा आहे. तसेच मोठा स्विमिंग पूलदेखील आहे.
6 / 11
फार्महाऊसच्या आजूबाजूला डोंगर असल्यामुळे पावसाळ्यात इथे धबधबे पाहायला मिळतात.
7 / 11
शिवाय फार्महाऊसला लागून एक छोटी नदीदेखील आहे.
8 / 11
प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसमध्ये आपणही भाडे देऊन राहू शकतो.
9 / 11
प्राजक्ताने सध्या तिचं फार्महाऊस Stay Leisurely यांच्याकडे हँडओव्हर केलं आहे. त्यांच्या ऑफिशिअल साईटवर या फार्महाऊसची सगळी माहिती देण्यात आली असून त्याचं एक दिवसाचं भाडं किती हेदेखील सांगण्यात आलं आहे.
10 / 11
या फार्महाऊसवर एकाचवेळी १५ पेक्षा जास्त व्यक्ती राहू शकतात. तसंच केवळ २ व्यक्तींसाठीदेखील हा फार्महाऊस उपलब्ध आहे. परंतु, यासाठी बरीच मोठी रक्कम मोजावी लागेल.
11 / 11
प्राजक्ता माळीच्या फार्महाउसमध्ये राहण्याचा खर्च १५ ते ३० हजार रुपये आहे. तिथे जेवणाची उत्तम सोयदेखील आहे.
टॅग्स :प्राजक्ता माळी