तुमची कधी भांडणं होतात का? प्रथमेश हसतच म्हणाला, 'अनेकदा आमच्यात गाणं...' By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 1:46 PM1 / 8'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या पंचरत्नांपैकी दोन रत्न लवकरच लग्नबंधनात अडकत आहेत. कोण ते कळलंच असेल. लिटिल मॉनिटर आणि मोदक म्हणजेच प्रथमेश (Prathamesh Laghate) आणि मुग्धा (Mugdha Vaishampayan) दोघांनी प्रेमाची कबुली देत सर्वांना सुखद धक्काच दिला.2 / 8प्रेमाची कबुली दिल्यानंतर या गोड कपलसाठी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. तसंच चाहत्यांना अनेक प्रश्नही पडले. लग्न कधी आहे, तुमचं कसं जुळलं, एकमेकांमध्ये नक्की काय आवडलं, कोणी कोणाला प्रपोज केलं असे शेकडो प्रश्न चाहत्यांनी विचारलेत.3 / 8तर मुग्धा आणि प्रथमेश दोघांनी एकत्र येत सर्व प्रश्नांना उत्तरं दिली. अनेक ठिकाणी त्यांना केळवणाचंही आमंत्रण येतंय. दोघंही ठिकठिकाणी मुलाखती देत नात्यातील गंमतीजमती शेअर करत आहेत आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत.4 / 8नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मुग्धा आणि प्रथमेश यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यामध्ये लग्नाला अजून किमान सहा महिने तरी आहेत असं त्यांनी सांगितलं. तसंच दोघांचं आता शिक्षण झालं आहे तर गाण्याचं करिअरही सुरळीत सुरु आहे त्यामुळे आता लग्न करायला हरकत नाही असं त्यांनी म्हटलंय.5 / 8या गोड कपलमध्ये कधी भांडणं होतात का असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला तेव्हा प्रथमेश हसतच म्हणाला, 'खूप वेळा. असं अजिबातच नाही की आमची भांडणं होत नाहीत. आमच्यातही खटके उडतात.काही वेळा गाणं ठरवण्यावरुन पण भांडणं होतात.'6 / 8प्रथमेश पुढे म्हणाला,'बऱ्याचदा वक्तशीरपणा हे सुद्धा आमच्यातल्या भांडणाचं कारण असतं. मुग्धा पटापटा आवरते म्हणजे ती वेळ पाळणारी आहे. मी हळूहळू आवरतो वेळेत पोहोचत नाही त्यामुळे ती अनेकवेळा चिडते. पण मी आता सुधरतोय.'7 / 8मुग्धा आणि प्रथमेशचं नातं असंच छान हसतखेळत राहावं अशी इच्छा सर्वच चाहते व्यक्त करत आहेत. या लिटिल चॅम्प्सला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेनेच पाठिंबा दिलाय. त्यामुळे दोघांनी प्रेक्षकांचे, चाहत्यांचे आभार मानलेत. 8 / 8मुग्धा मूळची अलिबागची असून प्रथमेश रत्नागिरीचा आहे. दोघांच्या गाण्याचा जॉनर सारखाच असल्याने त्यांचे आधीपासूनच एकत्र कार्यक्रम होत आहेत. आता दोघांना जीवनसाथी म्हणून एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications