प्रिन्स नरुलानं लेकीसोबत साजरा केला 34 वा वाढदिवस, फोटो शेअर करत मुलीचं नावही सांगितलं By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 1:12 PM1 / 7Prince Narula Daughter : टीव्हीवरील लोकप्रिय कपल प्रिन्स नरुला (Prince Narula) आणि युविका चौधरी (Yuvika Chaudhary) हे कायम चर्चेत असतात. नुकतेच ते आईबाबा झाले आहेत. युविकाने लग्नानंतर सहा वर्षांनी पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. युविकाने गोंडस परीला जन्म दिला आहे.2 / 7काल 24 नोव्हेंबर रोजी प्रिन्स नरुलाने आपला 34 वा वाढदिवस लेकीसोबत साजरा केला. 3 / 7प्रिन्स नरुलाने त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. यात तो त्याच्या लाडक्या लेकीसोबत दिसून येत आहे. 4 / 7प्रिन्स काळ्या लेदरच्या शर्टमध्ये डॅशिंग दिसतोय. या फोटोंमध्ये प्रिन्सने आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला नाही. 5 / 7हे फोटो शेअर करताना प्रिन्सने आपल्या मुलीसाठी एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिले, 'HAPPY BIRTHDAY PAPA दिल तू जान तू जद तक मैं जीना, मेरे जीने दी वजह तू ... तुला 30 मिनिटे भेटण्यासाठी मी रोडिज सोडून तिन तासांची फ्लाईट आणि 14 तासांचा रोड प्रवास करुन आलोय. तुला पाहून सर्व थकवा विसरलो. बाळा तु बाबांचा जीव आहेस'.6 / 7युविका आणि प्रिन्सने आपल्या मुलीला एक सुंदर नाव दिले आहे. प्रिन्सने आपल्या पोस्टमध्ये मुलीच्या नावाचा खुलासा केला. पुढे त्याने लिहलं, 'एकलिन (ekleen) ला बाबांपेक्षा जास्त कोणीच प्रेम करु शकत नाही. बाबा तुझी कायम रक्षण करेल. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि मला एवढा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद #prileen'.7 / 7प्रिन्सने या पोस्टमध्ये एकलिन आणि prileen अशा दोन नावांचा उल्लेख केला आहे. हे दोन्ही नावे शीख आहेत. यापैकी कोणतं नावं त्याच्या मुलीचं आहे की दोन्ही नावे तिचीच आहेत, हे स्पष्ट नाही. प्रिन्सचे चाहते त्याच्या पोस्टवर जोरदार कमेंट करत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications