By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 18:26 IST
1 / 9प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर आज अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराचे फोटो हृदय पिळवटून टाकणारे आहेत.2 / 9राजू श्रीवास्तव यांनी काल बुधवारी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजू यांना अखेरचा निरोप देताना सर्वांनाच अश्रू अनावर झालेत. राजू यांच्या पत्नी शिखा हमसून हमसून रडल्या.3 / 9राजू श्रीवास्तव यांचा मुलगा आयुष्यमान यांनी अश्रू रोखून धरले होते पण त्याच्या चेहऱ्यावरचे दु:ख पाहून प्रत्येकजण भावुक झाला.4 / 9आयुष्यमानने पित्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. पित्याच्या अंत्यसंस्कारावेळी आयुष्यमानची अवस्था अनेकांना बघवत नव्हती.5 / 9राजू यांच्या कुटुंबीयांची अवस्थाही वाईट होती. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. चेहऱ्यावर दु:ख होते.6 / 9या दु:खाच्या प्रसंगी प्रत्येकजण राजू यांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न करत होता. सगळे राजू यांच्या पत्नी शिखा यांना धीर देत होते.7 / 9बॉलिवूड दिग्दर्शक मधुर भंडारकर राजू यांच्या अंत्यसंस्कारावेळी हजर होते. त्यांनी राजू यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.8 / 9कधीकाळी एकत्र लोकांना खळखळून हसवणारा राजू यांचा मित्र सुनील पाल हाही यावेळी हजर होता.9 / 9राजू श्रीवास्तव यांचा मित्र एहसान कुरेशी यानेही आपल्या लाडक्या मित्राला अखेरचा निरोप दिला. 41 दिवस राजू व्हेंटिलेटरवर होते. काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंत्ययात्रेत त्यांचे शेकडो चाहते सामील झाले होते.