Rakhi Sawant : "मला श्रद्धासारखं..."; राखी सावंतच्या आयुष्यात पुन्हा वादळ; आदिल खानवर केला गंभीर आरोप By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 1:33 PM1 / 14राखी सावंतने नुकतीच आपली आई गमावली आहे. त्यानंतर आता तिने आपला नवरा आदील खान दुर्रानीवर गंभीर आरोप केले आहेत. राखीने पुन्हा एकदा मीडियासमोर आपल्या मनातील राग व्यक्त केला. राखीचं वैवाहिक जीवन चांगलं चाललेलं नाही, उलट पती आदिल खान दुर्रानी तिला वापर करत असल्याचं तिने म्हटलं आहे. 2 / 14आदिलचे कोणत्या तरी मुलीसोबत अफेअर सुरू आहे आणि याच कारणामुळे तो सर्वांसमोर लग्नाची बाब मान्य करत नव्हता. राखीने आदिलवर गंभीर आरोप करत तिला श्रद्धा वालकरप्रमाणे फ्रीजमध्ये जायचे नसल्याचं सांगितलं आहे. राखीने अलीकडेच आदिल दुर्रानीसोबतच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 3 / 14लग्नाच्या वेळी रजिस्टरची कागदपत्रे आणि फोटो शेअर केले होते आणि आदिलसोबत लग्न झाले आहे, पण तो सर्वांसमोर स्वीकारण्यास नकार देत असल्याचेही सांगितले होते. हे प्रकरण चर्चेत आले आणि राखीने सांगितले की, सलमान खानने आदिलशी बोलून लग्न स्वीकारले. यानंतर दोघांचे आनंदात असलेले फोटो आणि व्हिडीओ समोर आले.4 / 14राखीचे लग्न योग्य मार्गावर जात असल्याचे मानले जात होते. पण आईच्या निधनानंतर राखीने आदिलच्या प्रेयसीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. पापाराझीशी बोलताना राखी सावंत म्हणाली, 'तुम्हा लोकांच्या माध्यमातून मी त्या मुलीला सावध करू इच्छिते की जेव्हा मी बिग बॉस मराठी 4 मध्ये होते तेव्हा तिने या संधीचा फायदा घेतला.'5 / 14'मी तिचे नाव सांगणार नाही पण वेळ आल्यावर फोटो आणि व्हिडीओ दाखवेन. आदिलने त्याच्या अफेअरमुळे हे 8 महिने लपवून ठेवले. तो म्हणतो, तू माझी देव आहेस, खुदा, अल्लाह के बाद तूच आहेस.. नाही माझी तुलना खुदासोबत करू नकोस.. मला पत्नी, मुलांची आई व्हायचे आहे.'6 / 14'मला माणूस व्हायचे आहे. मला हे सगळं सांगायचं नव्हतं, आत्तापर्यंत गप्प राहिले. त्या मुलीमुळे आदिल खानने लग्नास नकार दिला. त्यानंतर मीडिया-फॅन्स आणि जगाच्या भीतीने लग्नाचा स्वीकार केलं. मला कोणाची शिडी व्हायचे नाही. मला शिडी बनवू नका' असं राखीने म्हटलं आहे. 7 / 14राखीने आदिलच्या प्रेयसीला इशारा दिला की, 'एक महिला एका महिलेचे घर तोडत आहे, मी तुझे नाव, फोटो आणि व्हिडीओ समोर आणत नाही याचे तू आभार मानायला हवे. नजर खाली करून कसे सहन करायचे हे माहितीय पण डोळे उघडून स्वाभिमान आणि लग्नासाठी कसे लढायचे हेही मला कळते.'8 / 14'मी इतर मुलींप्रमाणे गप्प बसणार नाही, आदिलला सोडले नाही तर व्हिडीओ फोटो व्हायरल करेन. आदिल, त्या मुलीला सोडून दे.' याच दरम्यान राखी सावंतला तिच्या जीवाची भीती वाटत आहे. दिल्लीतील आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर प्रकरणाचं तिने उदाहरण दिलं आहे. 9 / 14'मीडियासमोर कशाला येते, घरीच राहा असं म्हणतात. पण घरी राहून मला फ्रीजमध्ये जायचे नाही. मी एक विवाहित महिला आहे आणि माझ्या हक्कांसाठी लढणार आहे. आदिल त्या मुलीला सपोर्ट करत आहे, त्यामुळेच तो मला सोडून तिच्याशी लग्न करेल' असंही राखीने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 10 / 14राखीने काही दिवसांपूर्वी तिच्या प्रेग्नेंसी आणि गर्भपाताची माहिती दिली होती, जी ऐकून सगळेच अवाक् झाले. राखी सावंतने खुलासा केला होता की ती गरोदर होती पण तिचा गर्भपात झाला. राखीचे म्हणणे आहे की, तिने मराठी बिग बॉसमध्येही याबद्दल सांगितले होते पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही.11 / 14सेलिब्रिटी फोटोग्राफर वायरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये राखी सावंतचा फोटो हृदय तुटलेल्या इमोजीसह होता. या पोस्टद्वारे असे सांगण्यात आले होते की राखी सावंतसोबत त्यांचे संभाषण झाले, ज्यामध्ये अभिनेत्रीने तिचा गर्भपात झाल्याचा खुलासा केला होता.12 / 14राखी सावंतने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, ती जर आदिलसोबत राहिली नाही तर ती आपल्या मुलाला एकटेच वाढवेल. तेव्हापासून राखी सावंत प्रेग्नंट असल्याचा दावा केला जात होता. याच दरम्यान आता आदिलने पुढे येऊन राखीच्या गर्भपातामागचं नेमकं सत्य सांगितलं आहे.13 / 14आदिल खानने राखी सावंतच्या गर्भपाताच्या वृत्ताला पूर्णविराम देत ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं म्हटलं होतं. तसे काहीही झालेले नाही. खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. आदिलने त्याच्या आणि राखीच्या लग्नाचा फोटो शेअर करत लिहिलं होतं की, 'फेक न्यूज आहे.'14 / 14'मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की अशा विषयांवर कोणत्याही प्रकारच्या फेक न्यूज प्रकाशित करू नका.' यासोबतच एक व्हिडीओ शेअर करताना राखी आणि आदिल या दोघांनीही अभिनेत्री गरोदर नव्हती किंवा तिचा गर्भपात झाला नसल्याचं म्हटलं आहे. ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications