Join us  

रक्षाबंधन 2024 : शिव ठाकरेने लाडक्या बहिणीला ओवाळणीत किती पैसे दिले? पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:16 PM

1 / 10
रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024) हा सण बहीण-भावाच्या दृढ नात्याचा सोहळा असतो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते, त्याला राखी बांधते, भाऊ आपल्या बहि‍णीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि लाडक्या बहि‍णीला ओवाळणी म्हणून पैसे किंवा खास वस्तू भेट देतो. ही प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. सध्या शिव ठाकरे (Shiv Thakare) रक्षाबंधनामुळे चर्चेत आला आहे.
2 / 10
मध्यमवर्गातील शिवने अपार मेहतनीच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. शिवच्या यशात त्याच्या आईवडिलांबरोबर बहिणीचाही मोठा वाटा आहे. म्हणूनच यंदाच्या रक्षाबंधनाला शिवने अत्यंत खास पद्धतीने साजरा केला.
3 / 10
शिव ठाकरेने सोशल मीडियावर रक्षाबंधनाचे खास फोटो पोस्ट केले आहेत.
4 / 10
बहिण-भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतिक म्हणजे हा रक्षाबंधनाचा सण होय. यंदा रक्षाबंधनाचा सण 19 ऑगस्टला साजरा करण्यात आला. शिवच्या बहिणीने त्याला राखी बांधून बहीण भावाच्या या नात्याचा आनंद अधिक द्विगुणीत केला.
5 / 10
यावेळी शीवने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केलं होतं. तर त्याच्या बहिणीने जांभळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला होता.
6 / 10
दोघेही उत्साही आणि आनंदी दिसून आले. यावेळी बहिणीने राखी बांधल्यावर तिला ओवाळणी म्हणून टाकण्यासाठी शिवने खूप सारे पैसे जवळ ठेवल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळालं.
7 / 10
सोशल मीडियावर शिवने फक्त फोटोच नाही तर एक मजेशीर रील देखील शेअर केली आहे.
8 / 10
ज्यामध्ये शीवच्या हातात खूप साऱ्या नोटा दिसून येत आहे. पण, बहिणने ओवाळ्यानंतर तो तिला फक्त दहा रुपये देताना पाहायला मिळतोय. यावेळी दोघांचाही खोडकर अंदाज पाहून चाहते खूश झाले आहेत.
9 / 10
शिवच्या बहिणीचं नाव मनीषा असं आहे. या बहिण-भावामध्ये खास बॉन्डिंग आहे. दोघेही एकमेंकाची साथ देताना दिसून येतात.
10 / 10
शिवचं त्याच्या कुटुंबीयांबरोबर अगदी जवळचं नातं आहे. शिव सोशल मीडियावरही त्याच्या फॅमिलीबरोबरचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो.
टॅग्स :शीव ठाकरेरक्षाबंधनसेलिब्रिटीपैसासोशल मीडिया