'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्याने शेअर केला लग्नाचा अल्बम, बायकोसोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 10:12 AM1 / 8सध्या सिनेविश्वात लगीनघाई सुरू आहे. काही सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.2 / 8'रंग माझा वेगळा' फेम अभिनेता निखिल राजेशिर्केने १७ नोव्हेंबरला लग्नगाठ बांधली. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्याने सात फेरे घेतले. 3 / 8लग्नानंतर निखिलने आता त्याच्या लग्नाचा अल्बम शेअर केला आहे. निखिलने त्याच्या पत्नीबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 4 / 8निखिलने लग्नासाठी पारंपरिक पोशाख केला होता. तर रिसेप्शनला त्याने काळ्या रंगाचा ब्लेझर घातला होता. 5 / 8निखिलच्या आयुष्यातील हे सुंदर आणि मौल्यवान क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 6 / 8लग्नातील पत्नीसोबतच्या रोमँटिक फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 7 / 8निखिलने 'छोटी मालकीण', 'रंग माझा वेगळा', 'असेही एकदा व्हावे', 'अजूनही बरसात आहे', 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकांमध्ये काम केलं आहे. 8 / 8त्याने 'बिग बॉस मराठी'मध्ये सहभाग घेतला होता. निखिलने अनेक सिनेमांतही काम केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications