रसिका सुनिलने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो,एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 12:24 PM1 / 10रसिकाला तिच्या मालिकेतील नावानं म्हणजेच 'शनाया' या नावानं जास्त ओळखलं जातं.2 / 10विशेष म्हणजे निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिकाने शनाया साकारली होती. 3 / 10तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना भावला होता. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील रसिकांच्या शनाया पसंतीस पात्र ठरली होती. 4 / 10रसिका सुनिल आदित्य बिलागीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 5 / 10दोघांनीही नविन वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांचं नातं सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑफिशिअल केलं होतं. 6 / 10दोघेही सोशल मीडियावर त्यांच्या खास क्षणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसले. 7 / 10आता पुन्हा एकदा रसिकाने बॉयफ्रेंड आदित्यसोबतच एक छानसा फोटो शेअर केला आहे.फोटोला समर्क अशी कॅप्शनही दिली आहे.8 / 10दोघांचा हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांचे पुन्हा हार्ट ब्रेक झाले असणार. तर दुसरीकडे लाईक्स आणि कमेंट्स करत चाहते फोटोला पसंती देत आहेत.9 / 10 सा-या जगापासून दूर आणि कोणालाही जराही कुणकुण लागू न देता गुपचुप गुपचुप दोन दिल एकत्र आले होते.10 / 10आता प्यार किया तो डरना क्या म्हणत ते करतायत खुल्लम खुल्लम खुल्ला प्रेम. आणखी वाचा Subscribe to Notifications