Join us

'रात्रीस खेळ चाले'मधली सुशल्या आठवतेय? खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:18 IST

1 / 10
'रात्रीस खेळ चाले' ही छोट्या पडद्यावरील अतिशय गाजलेली हॉरर मालिका. या मालिकेतील सर्वच कलाकारांना लोकप्रियता मिळाली.
2 / 10
अण्णा नायकांच्या शेवंताबरोबर वाड्यात राहणारी आणि हातांनी केसांची बट फिरवणारी सुशल्या ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.
3 / 10
शेवंताची लेक दाखवलेली सुषमा ही भूमिका अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी हिने साकाराली होती.
4 / 10
ऋतुजाला सुशल्या या भूमिकेने प्रसिद्धीझोतात आणलं. तिचं काम प्रेक्षकांना भावलं होतं. 'रात्रीस खेळ चाले'च्या तिसऱ्या भागात मात्र ती दिसली नाही.
5 / 10
'रात्रीस खेळ चाले'मधून प्रसिद्धी मिळालेल्या ऋतुजाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहते.
6 / 10
ऋतुजा खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. अनेकदा तिचे हॉट फोटो ती शेअर करत असते.
7 / 10
जीममधील व्यायाम करतानाचे आणि डान्स करतानाचे व्हिडिओदेखील ती शेअर करते.
8 / 10
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वात ती सहभागी झाली होती. पण, लवकरच तिला घराचा निरोप घ्यावा लागला होता.
9 / 10
'खुलता कळी खुलेना', 'सरस्वती' या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
10 / 10
अलिकडेच ती 'आदिशक्ती' या मालिकेत दिसली होती. यामध्ये तिने महिला पोलिसाची भूमिका साकारली होती.
टॅग्स :रात्रीस खेळ चालेटिव्ही कलाकार