"देवाने मला वाचवलं..."; वाढदिवसाआधी अभिनेत्रीचा अपघात; चेहऱ्यावर जखमा, झाली भावुक By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2024 10:04 AM1 / 10अभिनेत्री रीम शेख सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांना देत असते. आज ८ सप्टेंबरला रीम तिचा वाढदिवस साजरा करत आहे. 2 / 10अभिनेत्रीने आपल्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी एक फोटो शेअर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला. यामध्ये तिने सांगितलं की, तिचा एका भीषण अपघात झाला आहे. मात्र हे सांगताना तिने देवाचे आभार मानले.3 / 10रीमने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. 'मी एका दुःखद अपघाताची शिकार झाले, पण देवाने मला या अपघातातून वाचवलं ज्यामुळे माझं आयुष्य बदलू शकलं असतं'4 / 10'चमत्कार काय असतो... तुमच्या आवडीचं चॉकलेट तुमच्या हातात येणं नाही तर देवाच्या टायमिंग आणि प्लॅनिंगनुसार हे सर्व घडतं. माझं आयुष्य बदलू शकणाऱ्या गोष्टीपासून मला वाचवल्याबद्दल मी देवाची आभारी आहे.'5 / 10'अल्लाहचे आभार मानते. या परिस्थितीत मला धीर दिल्याबद्दल आणि माझ्या चेहऱ्यावरील हास्य आणण्यासाठी मी अल्लाहची आभारी आहे. मला खूप चांगले मित्र भेटले आहेत, जे मला यानंतर भेटायला आले. त्यांनी माझी काळजी घेतली.'6 / 10'तुमच्या प्रेमाने मला वेदना विसरण्यास मदत केली. आई-बाबा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आई, बाबा, आजी, तुम्ही तिघे माझी शक्ती आहात. तुम्ही लोकांनी मला या कठीण काळातून बाहेर काढण्याचं ठरवलं.' 7 / 10'माझी खूप चांगली काळजी घेतली आणि माझे चाहते जे माझ्यासाठी माझ्या कुटुंबासारखेच आहेत. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही सर्व माझ्या पाठीशी उभे आहात. धन्यवाद' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. 8 / 10रीम शेखने मैं आजी और साहिब, ये रिश्ता क्या कहलाता है, ना बोले तुम, ना मैं कुछ कहा 2, खेलता है जिंदगी आँख मिचौली, दिया और बाती हम, चक्रवर्ती सम्राट अशोक, तुझसे है राबता, फना: इश्क में मरजावां असे शो केले आहेत.9 / 10अभिनेत्री सध्या लाफ्टर शेफ्स या शोमध्ये दिसत आहे. रीमचे असंख्य चाहते आहेत. सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications