'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधील तुलसीची सासू आठवतेय का? वयाच्या ६४व्या वर्षात ही अभिनेत्री दिसते अशी By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 6:51 PM1 / 10'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेत स्मृती इराणीच्या सासू सविताची भूमिका साकारून अपारा मेहता घराघरात नावारूपास आल्या. आता २४ वर्षांनंतर त्या काय करताहेत,हे जाणून घेऊयात.2 / 10९० च्या दशकातील बऱ्याच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर खोलवर छाप सोडली. यामध्ये स्टार्सची फौज असलेल्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेचा समावेश होता. बा, तुलसी आणि मिहिरसह संपूर्ण कलाकार अजूनही चाहत्यांना आठवतात. अपरा मेहता यांनी स्मृती इराणी म्हणजेच तुलसी विराणीच्या सासू सविताची भूमिका साकारली होती. 3 / 10क्योंकी सास भी कभी बहू थी ही मालिका २००० ते २००८ या काळात प्रसारित झाली होती. ही मालिका एकता कपूरने बनवली होती. कथा एका मोठ्या कुटुंबाची होती, ज्यात स्मृती इराणी, अमर उपाध्याय, इंदर कुमार, रोनित रॉय, दिनेश ठाकूर, सुधा शिवपुरी, मंदिरा बेदी, जया भट्टाचार्य, अपरा मेहता, सुमित सचदेव, रिवा बब्बर, नमन शॉ, कृतिका सेंगर धीर आदी कलाकार होते. 4 / 10अनिता हसनंदानी, पलक जैन, हितेन तेजवानी, गौरी प्रधान, आकाशदीप सेहगल, मौनी रॉय, मानव विज, अमित टंडन, हुसैन कुवाजरवाला, शब्बीर अहलुवालिया, करणवीर बोहरा, शिल्पा सकलानी, पुलकित सम्राट आणि टिया बाजपेयी यांच्यासह स्टार्सची फौज होती.5 / 10स्मृती इराणीच्या ऑनस्क्रीन सासूची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपारा मेहता वयाच्या १५ व्या वर्षी कॅमेऱ्यांच्या दुनियेचा एक भाग बनल्या आणि आजही त्या ग्लॅमरच्या दुनियेत त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.6 / 10गुजरातमध्ये जन्मलेल्या आणि मुंबईत वाढलेल्या अपरा मेहता यांनी दूरदर्शनच्या 'संताकुकडी' या मुलांसाठी टीव्हीवर कार्यक्रमाचे अँकरिंग केले. 7 / 10यानंतर त्यांना 'एक महल हो सपनो का' (१९९७) मधून मोठा ब्रेक मिळाला. 'क्योंकी सास भी कभी बहू थी'मध्ये त्यांनी सविता मनसुख विराणीची भूमिका साकारली होती.8 / 10अपरा यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले. 'ये तेरा घर ये मेरा घर' (२००१), 'चोरी चोरी चुपके चुपके', 'देवदास', 'जस्ट मॅरेज', 'तीस मार खान' आणि गुजराती चित्रपट 'बचूभाई' (२०२३)मध्येही त्यांनी काम केले आहे.9 / 10अपरा यांचे वय ६४ वर्षांचे असून त्या अजूनही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत आहे. निया शर्माच्या 'सुहागन चुडैल' या मालिकेत त्या योगिनी कपिलाच्या भूमिकेत दिसल्या आहेत. हा शो कलर्स वाहिनीवर येतो. त्यांनी 'अनुपमा' या मालिकेत अनुपमाच्या 'गुरुजी'ची भूमिकाही साकारली आहे.10 / 10अपराचे वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. ८० च्या दशकात तिने टीव्ही आणि चित्रपट अभिनेता दर्शन जरीवालासोबत लग्न केल्याचे सांगितले जाते. त्यावेळी ती फक्त १८ वर्षांची होती. त्यांना एक मुलगीही आहे, तिचे नाव खुशाली आहे. त्यांनी मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले, पण नंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघेही वेगळे झाले. त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही आणि अजूनही ते चांगले मित्र आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications