लिपस्टिक-काजळ विकून 'या' अभिनेत्रीने उभी केली 820 कोटींची कंपनी, अभिनयाला केला रामराम By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 11:44 AM1 / 12तुम्ही अनेक टीव्ही अभिनेत्रींबद्दल ऐकलं असेल ज्यांनी अभिनयात खूप नाव कमावलं. पण तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल माहिती आहे का? जिने अभिनयाला रामराम करून कोट्यवधींची कंपनी उभी केली आहे. कोट्यधीश असलेल्या अशाच एका सुंदर अभिनेत्रीबाबत जाणून घेऊया...2 / 12टीव्ही इंडस्ट्रीतलं लोकप्रिय नाव असलेल्या आशका गोराडियाने अभिनयापासून दूर जाण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यानंतर आशकाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. तसेच ती तिच्या पर्सनल आयुष्यावरही फोकस करत आहे. 3 / 12आशका गोराडियाची मौनी रॉय आणि जुही परमार यांच्याशी चांगली मैत्री आहे. २७ नोव्हेंबर १९८५ रोजी जन्मलेली आशका गुजरातची रहिवासी आहे. तिने अभिनय क्षेत्रात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 4 / 12२००२ मध्ये आशका गोराडियाने 'अचानक 37 साल बाद' नावाचा शो केला होता. तेव्हा तिचं वय फक्त १६ वर्षे होतं. पण तिला 'कुसुम' या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली, ज्यामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. 5 / 12अभिनेत्रीने त्यानंतर पिया का घर, कहीं तो होगा, सिंदूर तेरे नाम का, विरोध या शोमध्ये काम केलं आहे. २०१९ मध्ये आलेला डायन हा तिचा शेवटचा शो होता. यानंतर तिने टीव्ही इंडस्ट्रीला रामराम केला आणि व्यवसायात नशीब आजमावलं.6 / 12लिप सर्जरीमुळे आशका प्रसिद्धीच्या झोतात आली होती. यामुळे तिचा संपूर्ण लुकच बदलला होता. तेव्हा तिला अनेकांनी ट्रोल केलं होतं. तसेच तिच्या या लूकवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या. 7 / 12आशका गोराडियाच्या लव्ह लाईफबद्दल सांगायचं तर ती टीव्ही अभिनेता रोहित बक्शीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही जवळपास दहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं.8 / 12अभिनेत्रीने २०१७ मध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. तिने अमेरिकन उद्योगपती ब्रेंट गोबलशी लग्न केलं. आता दोघांनाही एक मुलगा आहे. ती अनेकदा पती आणि मुलासोबतचे फोटो शेअर करत असते.9 / 12अभिनेत्रीने स्वतःचा Renee हा ब्रँड सुरू केला आहे. आजच्या काळात या लोकप्रिय ब्रँड आहे. रश्मिका मंदानाने देखील याची जाहिरात केली आहे. 10 / 12Renee हे कॉस्मेटिक विश्वातील एक मोठं नाव असून त्यांचं काजळ ते लिपस्टिकपर्यंतचे सर्व प्रोडक्ट प्रसिद्ध आहेत.11 / 12आशकाने आपल्या दोन बिझनेस पार्टनरसोबत मिळून तब्बल ८२० कोटींची कंपनी उभी केली आहे. ही कंपनी २०० हून जास्त प्रोडक्ट विकते. यांचे देशभरात ६५० हून अधिक स्टोर आहे. ज्यामध्ये थेट कस्टमरसोबत डील केलं जातं. 12 / 12 आणखी वाचा Subscribe to Notifications